५० शब्दांचे ट्विट, ६२८ रिट्विट; आर्थिक सुधारणाकर्त्यांच्या वारशाविषयी काँग्रेसजनांची “ही” आस्था…!!

विनायक ढेरे

नाशिक – “५० शब्दांचे ट्विट, ६२८ रिट्विट; आर्थिक सुधारणाकर्त्यांच्या महान वारशाविषयी काँग्रसजनांची आजची आस्था आहे… माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची आज सांगता झाली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून त्यांना ८ तासांपूर्वी आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेसने केलेले ट्विट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ट्विटर हँडलवरून रिट्विट करण्यात आले. बाकी कोणतेही कार्यक्रम नरसिंह रावांच्या जन्मशताब्दीच्या सांगते निमित्त काँग्रेसने घेतले नाहीत. 50 word tweet, 628 retweets

सोनिया गांधींनी निदान नरसिंह रावांना आदरांजली वाहणारे काँग्रेसचे ट्विट रिट्विट तरी केले. पण राहुल आणि प्रियांका गांधी यांनी तसे करण्याची देखील तसदी घेतली नाही. नरसिंह राव नावाचे आपल्याच काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान होते, हे या दोन्ही गांधींच्या गावीही नाही. सोनिया गांधींच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले रिट्विट ६२८ वे आहे. या पलिकडे नरसिंह राव जन्मशताब्दीची दखल काँग्रेसजनांनी घेतल्याचे दिसले नाही.

केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि तेलंगणमधील भाजप नेते जी. किशन रेड्डी यांनी ट्विट करून काँग्रेसजनांना चांगलेच टोचले. पण त्यांनी देखील नुसत्या ट्विटरवर आदरांजली वाहून भागवून घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये नरसिंह राव यांच्या आर्थिक सुधारणा धोरणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. भाजपच्या नेत्यांनी मन की बात रिट्विट केली. त्यांचे काम झाले. भाजपच्या बाकीच्या नेत्यांनी देखील नरसिंह राव यांना ट्विटरांजली वाहण्याची तसदी घेतली नाही.

50 word tweet, 628 retweets

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात