Maharashtra : महाराष्ट्रात भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत 5 नव्या दमाचे मुख्यमंत्री!!

maharashtra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra  महाराष्ट्रात भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली त्यामध्ये अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहेच, पण त्याचबरोबर या यादीचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये प्रथमच भाजपचे 5 नव्या दमाचे मुख्यमंत्री सामील करण्यात आले आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये या नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारात कुठे सहभाग घेतलाही असेल, परंतु त्यावेळी त्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत नव्हती.Maharashtra

मात्र 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या. त्या भाजपने जिंकल्या आणि त्यानंतर नव्या दमाचे मुख्यमंत्री त्या राज्यांमध्ये नेमले. ते आता भाजपचे स्टार प्रचारक बनून फिरून महाराष्ट्रात फिरणार आहेत.



यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा समावेश आहे.

योगी आदित्यनाथ हे 2019 पूर्वी देखील मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्रात त्यावेळी मुख्यमंत्री म्हणूनच प्रचार केला होता, पण 2024 च्या निवडणुकीत मात्र वर उल्लेख केलेले नेते आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या स्टार प्रचारक बनून प्रचारात सामील होणार आहेत.

या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आता आपापल्या राज्यांवरची आपली पकड घट्ट केली असून तिथे केंद्र सरकारच्या सर्व योजना आघाडीवर बसून राबविल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याचा त्यांचा आग्रह राहणार आहे. हरियाणाची निवडणूक भाजपसाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी महाराष्ट्रात कोठे प्रचार करणार याविषयी जनतेला उत्सुकता निर्माण झाली आहे.

5 new chief ministers are now maharashtra star campaigners

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात