महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ आणि भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाचा पाया घालणारे नेते आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांची ही मोलाची आठवण…1941 census _ savarkar and shyama prasad mukherjee prevented islamization of whole bengal provincne
CAA – NRC नागरिकत्व कायद्याबद्दल आज हिंदू समाजात जागृती झाली आहे. लव्ह जिहादपासून नार्कोटिक्स जिहाद पर्यंत अनेक विषयांवर हिंदू समाज बोलका झाला आहे. पण हा धोका स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात होता. आता त्याबद्दल खुलेपणाने हिंदू समाज बोलू लागला आहे.
पण बंगाल आणि आसामच्या इस्लामीकरणाचा धोका स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1941 मध्ये ओळखून त्या विषयी इशारा दिला होता. ते वर्ष होते, भारतातल्या जनगणनेचे. ही जनगणना इंग्रज करणार म्हणून काँग्रेसने त्यावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. नेमका हाच निर्णय हिंदूंसाठी घातक होता. लोकसंख्येच्या आकडेवारीतूनचे हे स्पष्ट होतेय. 1881 हिंदूंची सरासरी लोकसंख्या होती, 74% . 1931 मध्ये झाली 65% . 1881 मध्ये मुसलमानांची लोकसंख्या होती, 20% 1931 मध्ये झाली, 27% ही अखंड भारतातली स्थिती होती.
मुसलमान लोकसंख्येचा वाढता कल दिसत होता, बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत, संयुक्त प्रांत म्हणजे आताचा उत्तर प्रदेश या भागांमध्ये. हिंदूंनी जनगणनेवर बहिष्कार घालू नये. सर्व जातींच्या, पंथांच्या आणि उपपंथांच्या लोकांनी आपली नोंदणी हिंदू म्हणून करावी, असा आग्रह सावरकरांनी धरला होता. जाती – पंथांची नोंदणी केली, तरी त्याच्या पुढे “हिंदू” असे आवश्य लिहावे, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले होते. आर्य समाजी – हिंदू, लिंगायत – हिंदू, जैन – हिंदू, शीख – हिंदू, या या प्रकारात नोंदणी करावी, अशी सावरकरांनी भूमिका मांडली होती.
सावरकर – श्यामाजींनी पश्चिम आणि पूर्व बंगालमध्ये विविध भागांमध्ये फिरून हिंदू मेळावे, संमेलने घेऊन हिंदू समाजात जागृती घडवून आणली. 1939 ते 1941 या दोन वर्षांच्या काळात सावरकरांचे बंगालचे अनेक मोठे दौऱे झाले. या प्रत्येक दौऱ्यात श्यामाजी आघाडीवर होते. निर्मलचंद्र चटर्जी, आशुतोष लाहिरी, रामानंद चटर्जी, निर्मलचंद्र तेरजी, पद्मराज जैन आदी बंगाली नेते यामध्ये सहभागी झाले होते.
पूर्व बंगालमधल्या खुलना येथे ऑल बंगाल हिंदू कॉन्फरन्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कॉन्फरन्समुळे बंगाली हिंदूंचा आत्मविश्वास वाढला. या बाबत श्यामाजींनी आपल्या डायरीत विशेष उल्लेख केला आहे.
-आपल्या डायरीत श्यामाजी म्हणतात…
सन 1881 ते 1931 एवढ्या मोठ्या 50 वर्षांच्या काळात बंगालची लोकसंख्या इस्लमीकरणाकडे झुकल्याचा कल दाखवित होती. 1931 च्या जनगणनेत विविध जातीसमूहांनी आपली नोंदणी हिंदू म्हणून केल्याचे आढळते. या विषयी श्यामाजींच्या डायरीतले उल्लेख आपले डोळे उघडणारे आहेत. ते म्हणतात… अनुसूचित जाती आणि जमातींचा वाढता कल आपण हिंदू म्हणून नोंदणी करण्याकडे नव्हता. उच्चवर्णींयांच्या अन्यायाला कंटाळून त्यांनी स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याचे सोडल्याचे दिसायला लागले होते. ही हिंदू समाजासाठी आणि खुद्द अनुसूचित जाती – जमातींसाठी धोक्याची घंटा होती. कारण त्याच वेळी मुस्लीम समाज संघटन वाढत होते. हिंदू संघटना वाढविण्याचा निदान हिंदू समाजात जागृती आणण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही संपूर्ण हिंदू समाजाला आपल्या जातीच्या नव्हे, तर हिंदू समाज म्हणून नोंदणी करण्याविषयी आवाहन केले. सुरूवातीला अनुसूचित जातीच्या लोकांचा याला कडवा विरोध झाला. तरीही आमचा एकूण हिंदू समाजातल्या जागृतीच्या प्रसाराचा चांगला उपयोग दिसला. आम्ही जनगणनेच्या निमित्ताने बंगालमध्ये हिंदू समाजात एवढी जागृती नक्की आणू शकलो की त्याने जनगणनेत भाग घेऊन आपली एकजूट दाखवावी. हिंदू समाजाने चांगली एकजूट दाखविली…
श्यामाजींच्या डायरीतले हे उल्लेख बंगालमधली जातीय – सामाजिक वीण किती घट्ट होती आणि अथक प्रयत्नांनी ती कशी बदलली याची स्पष्ट जाणीव करून देतात. पण याचा परिणाम म्हणून बंगालचे त्यावेळचे पंतप्रधान फजलूल हक चांगलेच अस्वस्थ झाले. सावरकर – श्यामाजी बंगालचे “हिंदूकरण” करताहेत, असा आरोप त्यांनी केला. पण ते जनगणनेत हिंदूंची नोंदणी रोखू शकले नाहीत.
1941 च्या जनगणनेचा अंतिम परिणाम 1947 मध्ये फाळणीच्या वेळी दिसला. संपूर्ण बंगालचे पाकिस्तानमध्ये रूपांतर करण्याचा महंमद अली जीनांचा डाव सफल होऊ शकला नाही. पूर्व आणि पश्चिम बंगाल ही फाळणी जीनांना स्वीकारावी लागली. कारण पश्चिम बंगालमधील हिंदूंनी नोंदणी केल्यामुळे त्यांची लोकसंख्या अधिक भरली. पाकिस्तानात जाण्यापासून पश्चिम बंगालमधील हिंदू वाचले. कलकत्यासकट बंगालचा एक मोठा भूभाग भारतात राहिला. याचे श्रेय सावरकर – श्यामाजींच्या दूरदर्शी नेतृत्वाला आहे. कारण त्यांनी 1941 च्या जनगणनेच्या वेळी हिंदू समाजात मोठी जागृती घडवून आणली होती…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App