घरी शिकवणी घेण्यासाठी येत असलेल्या ५६ वर्षीय शिक्षकेचे १६ वर्षीय मुलाने आक्षेपार्ह शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे 16 yrs student take Teacher offensive video in washroom
विशेष प्रतिनिधी
पुणे -घरी शिकवणी घेण्यासाठी येत असलेल्या ५६ वर्षीय शिक्षकेचे १६ वर्षीय मुलाने आक्षेपार्ह शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी विधीसंघर्षित बालका विराेधात अलंकार पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 16 yrs student take Teacher offensive video in washroom
याबाबत पिडित शिक्षिकेने पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. पुण्यातील कयर्वेनगर परीसरातील एका साेसायटीत संबंधित ५६ वर्षीय शिक्षिका मागील पाच वर्षापासून एका मुलाला इंग्रजी विषय शिकविण्यासाठी जात असते. तीन मार्च ते ३० मार्च यादरम्यान सदर शिक्षिका वाॅशरुम मध्ये जाण्यापूर्वी संबंधित मुलाने त्याचाकडील माेबाईल फाेन वाॅशरुम मध्ये ठेवुन त्यात व्हिडिओ रेकाॅर्डिंग केले. त्यापूर्वी देखील शिक्षिका शिकवणी शिकवत असताना त्याने शिक्षिकेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकाॅर्ड करुन तिचा विनयभंग केला आहे. याबाबत पुढील तपास अलंकार पाेलीस करत आहे.
इनस्टाग्रामवरील ओळखीतून मुलीचा विनयभंग
पुण्यातील वडगावशेरी भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर साैरभ (वय-१९, पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्यासाेबत ओळख झाली. सदर मुलाने अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर सतत मेसेज, फाेन करुन तिच्या साेबत ओळख वाढवुन तिला धमकी देवून विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबला घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलीसांकडे मुलीच्या ४२ वर्षीय आईने आराेपी विराेधात विमाननगर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App