लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…


भारताचा शेजारी देश श्रीलंका हा स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे महागाईचा दर 17 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. येथे 1 कप चहासुद्धा 100 रुपयांवर मिळतोय. ब्रेडच्या एका पाकिटासाठी 150 श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागतात. श्रीलंकेतील महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया कमकुवत होणे हेदेखील आहे. मार्च महिन्यातच श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 46 टक्क्यांनी घसरले आहे.Inflation hits Sri Lanka: Sri Lankan rupee depreciates by 46% in just one month Read more


वृत्तसंस्था

कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका हा स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे महागाईचा दर 17 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. येथे 1 कप चहासुद्धा 100 रुपयांवर मिळतोय. ब्रेडच्या एका पाकिटासाठी 150 श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागतात. श्रीलंकेतील महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया कमकुवत होणे हेदेखील आहे. मार्च महिन्यातच श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 46 टक्क्यांनी घसरले आहे.

मार्चमध्येच, 1 डॉलरचे मूल्य 201 श्रीलंकन ​​रुपयांवरून 295 श्रीलंकन ​​रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे श्रीलंकेत महागाई वाढत आहे. यामुळे हे जाणून घ्या की, एखाद्या देशाचे चलन डॉलरच्या तुलनेत कसे ठरवले जाते आणि डॉलरच्या तुलनेत ते चलन कमकुवत झाल्यामुळे नेमके काय होते?

डॉलरच्या तुलनेत एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य कसे ठरवले जाते?

जर डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाचे मूल्य कमी झाले तर याला त्या चलनाचे पडणे, तुटणे, कमजोर होणे असे म्हणतात. प्रमाण भाषेत चलनाचे अवमूल्यन म्हणतात. प्रत्येक देशाकडे परकीय चलनाचा साठा असतो, ज्यातून तो आंतरराष्ट्रीय व्यवहार करतो. परकीय चलनाच्या साठ्यातील घट आणि वाढ यावरूनच त्या देशाच्या चलनाची चाल ठरत असते.



उदा. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीतील डॉलर, हे अमेरिकेकडे असलेल्या रुपयाच्या साठ्याइतके असेल तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील. आपल्याकडे डॉलर कमी झाला, तर रुपया कमजोर होईल, वाढला तर रुपया मजबूत होईल. याला फ्लोटिंग रेट सिस्टिम म्हणतात.

समजा अमेरिकेकडे 80,000 रुपये आहेत आणि आमच्याकडे 1,000 डॉलर आहेत. आणि जर डॉलरचे मूल्य 80 रुपये असेल, तर दोन्हींकडे समान रक्कम आहे. आता जर आपल्याला अमेरिकेतून एखादी वस्तू मागवायची असेल, ज्याची किंमत भारतीय चलनानुसार 8,000 रुपये आहे, तर आपल्याला त्यासाठी 100 डॉलर मोजावे लागतील. या व्यवहारानंतर भारताच्या परकीय गंगाजळीत उरतील 900 डॉलर शिल्लक राहतील.

दुसरीकडे, अमेरिकेच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भारताचे 80,000 रुपये होते ते तर आहेतच, उलट भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात असलेले १०० डॉलर्सही त्यांच्याकडे गेले. समतोल साधण्यासाठी भारतानेसुद्धा अमेरिकेला 100 डॉलर मूल्याची वस्तू विकणे गरजेचे आहे, परंतु जर तुम्ही डॉलर देऊन आयात करता तेवढा माल निर्यात केला नाही, तर रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढते.

श्रीलंकन ​​रुपयाच्या कमजोरीमुळे महागाई वाढली

श्रीलंका किंवा कोणताही देश एकतर स्वतःचा माल बनवतो किंवा परदेशातून आयात करतो आणि परदेशातून कोणतीही वस्तू आयात करण्यासाठी तुम्हाला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणत्याही देशातून तेल आयात करायचे असेल तर तुम्ही ते रुपयात देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त चलन वापरावे लागेल. म्हणजे श्रीलंकेला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, डॉलरच्या तुलनेत तुमचा श्रीलंकन ​​रुपया जितका कमजोर होईल तितकी श्रीलंकेत बाहेरून आयात केलेल्या वस्तूंच्या किंमती वाढतील.

श्रीलंका काय काय आयात करते?

श्रीलंका तेल, अन्न, कागद, साखर, डाळी, औषध आणि वाहतूक उपकरणांच्या आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकन ​​रुपया कमकुवत झाल्यामुळे श्रीलंकन ​​सरकार त्यांना जास्त किंमत मोजत आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती तेथे झपाट्याने वाढल्या आहेत. परिणामी देशातील महागाईही झपाट्याने वाढली आहे.

Inflation hits Sri Lanka: Sri Lankan rupee depreciates by 46% in just one month Read more

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात