वृत्तसंस्था
मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 11 MLAs 1 MP joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मिदानापूर येथे सभा घेतली. त्यावेळी तब्बल 11 आमदार आणि खासदाराने, एका माजी खासदाराने भाजपत प्रवेश केल्यामुळे तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 11 MLAs 1 MP joins bjp
सुवेंदू अधिकारी, तापसी मोंडल, अशोके दिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिस्वास, सुक्रा मुंडा, श्यामापदा मुखर्जी, विश्वजित कुंडू आणि बनश्री माती, अशी भाजपत प्रवेश केलेल्यांची नावे आहेत.
शहा यांच्या दौऱ्यापूर्वी राजकीय घडामोडीस प्रारंभ झाला होता. मिदानापूरचे मातब्बर नेते , आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याने ममता बॅनर्जी यांना आणि पक्षाला हादरा बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असताना आज मातब्बर नेत्यानी भाजपत प्रवेश करून दुसरा धक्का दिला.
अमित शहा म्हणाले….
– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App