‘सिंघम’ म्हणतो, ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ हा पंतप्रधानांनी सर्वांना दिलेला बॉडीगार्ड


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेतू या अ‍ॅपच्या रुपाने सर्व भारतीयांना एक बॉडीगार्ड दिला आहे, असे प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याने म्हटले आहे. यासाठी त्याने पंतप्रधानांना धन्यवाद दिले आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेतू या अ‍ॅपच्या रुपाने सर्व भारतीयांना एक बॉडीगार्ड दिला आहे, असे प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याने म्हटले आहे. यासाठी त्याने पंतप्रधानांना धन्यवाद दिले आहेत.

अजय देवगणने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो व्यायाम करताना स्वत: चा बॉडीगार्ड असे वर्णन करणार्या स्वत:चे एक पात्र सेतूशी संवाद साधत असल्याचे दिसतोय. सेतू अजयला सांगत आहे की, तो एक वेगळ्या प्रकारचा बॉडीगार्ड आहे. सेतूने इतर अनेक फायदे सांगताना म्हटले की, भारत सरकारने 130 कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक बॉडीगार्ड बनवला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजयने पीएमओ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, कोविड 19 सोबत लढण्यासाठी प्रत्येक भारतीयांना त्यांचा वैयक्तिक अंगरक्षक दिल्याबद्दल धन्यवाद… सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही. पंतप्रधान मोदींनी त्याच्या ट्विटचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले, अजय देवगण बरोबर म्हणाले. आरोग्य सेतू आपले, आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे रक्षण करते.

आरोग्य सेतू नावाचं अ‍ॅप

चिनी विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोदी सरकारने ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ लॉन्च केलं. चिनी विषाणूची जोखीम कितपत आहे, याबाबत आकलन करणारं हे अ‍ॅप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अ‍ॅपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितलं. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं.

हे अ‍ॅप तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे अ‍ॅप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना, या गोष्टी ट्रेस करतं.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात