शाहिद आफ्रिदीचे बरळणे सुरूच, म्हणे काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचेय


पाकिस्तानी क्रिकेट संघाचा अल्पकाळ कर्णधार राहिलेल्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची कामगिरी सुमार दर्जाची आहे. पाकिस्तानला कधीही उल्लेखनीय यश मिळवून न देऊ शकलेल्या आफ्रिदीने आता भारताला डिवचण्यासाठी काश्मीरच्या संघाचे कर्णधार व्हायचे असल्याची बालीश बडबड चालू केली आहे.


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचे बरळणे सुरूच आहे. आता त्याने काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात नसलेल्या भागाचा क्रिकेट संघ बनणार कसा हे मात्र तो सोईस्करपणे विसरला आहे.

पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद अल्पकाळ भूषविताना शाहीद आफ्रिदी पाकिस्तानला कधीही मोठे यश मिळवून देऊ शकला नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानलाही भारताविरुद्धच्या तिन्ही युद्धांमध्ये कायमच मात खावी लागली आहे. एवढेच नव्हे तर छुप्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रयत्नातही पाकिस्तान नेहमी मार खात आला आहे. तरीही सीमेपारहून होणारी बालीश बडबड थांबलेली नाही.

शाहिद आफ्रिदीने आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे विचित्र मागणी केली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका ठिकाणी बोलताना आफ्रिदी म्हणाला, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगू इच्छीतो की जेव्हा पुढच्यावेळी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाईल तेव्हा त्यात एका नव्या संघाचा समावेश केला जावा. हा संघ काश्मीरचा असेल. या टीमकडून अखेरचा क्रिकेट सामना कर्णधार म्हणून खेळण्यास मला आवडेल. मी पीसीबीला विनंती करतो की, पुढचा संघ काश्मीरचा असावा.

लोकांसमोर बोलताना आफ्रिदीला याचे देखील भान राहिले नाही की जो भाग पाकिस्तानचा नाही आणि त्यांच्या ताब्यात देखील नाही, अशा एका प्रदेशाच्या क्रिकेट संघाची तो मागणी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सवंग लोकप्रियतेसाठी आफ्रिदी बेताल वक्तव्ये करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तो म्हणाला होता की, सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या कोरोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.

आफ्रिदीच्या या वक्तव्यावर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी त्याला चांगलेच धुतले होते. पाकिस्तानला काश्मीर कधीच मिळणार नाही. पण तुम्हाल बांग्ला देश लक्षात आहे ना? अशा शब्दांत प्रसिध्द क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याने आफ्रिदीला सुनावले होते. भारताचा सलामीवीर शिखर धवन म्हणाला, यावेळी संपूर्ण जग चीनी व्हायरसशी लढत आहे, मात्र तुम्हाला काश्मीरची चिंता आहे. काश्मीर आमचे होते, आमचे आहे आणि आमचेच राहिल. तुम्ही २२ कोटी घेऊन या आमचा एक जण सव्वा लाखांचा मुकाबला करेल. बाकीचे सगळे गणित तुम्हीच करा.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात