महाविकास आघाडीकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला; सोशल मीडियात मुस्कटदाबी


महाविकास आघाडी सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांची मुस्कटदाबी चालवली आहे. नागरिकांचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याच हा प्रकार असून हा आदेश पोलीसांनी तातडीने मागे घ्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची भेट घेऊन केली. आमदार राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांची मुस्कटदाबी करत आहे. नागरिकांचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याच हा प्रकार असून हा आदेश पोलीसांनी तातडीने मागे घ्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची भेट घेऊन केली. आमदार राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलिस प्रशासन दुटप्पी भूमिका घेत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे. त्यांना मारहाण होत आहे. पण त्याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सोशल मिडियामध्ये होणा-या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल तक्रारी करूनही कारवाई होत नाही. फडणवीस यांना जीवे मारणाच्या धमक्या प्रकरणी पोलिसांकडे रितसर तक्रारी करुनही पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सोशल मिडिया व मिडीयाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याचा आरोप करून दरेकर म्हणाले की लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या भावना व मते व्यक्त करण्याचा आहे, पण १४४ कलमाचा आधार घेऊन लोकशाही स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पोलिस प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करित आहे.

कॉंग्रेस नेत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी

जुन्नर येथे अपंग व विधवांसाठी सामाजिक कार्य करणा-या बोराडे नावाचा तरुणाला कॉंग्रेसचे नेते शेरकर यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करावी. कारण सामिजाक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्याला अशी मारहाण होणार असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे जुन्नरच्या पोलिस अधिक्षकांना आदेश देऊन कॉंग्रेसच्या नेत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात