भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नऊ कुटुंबे दत्तक घेण्याचा आदेश


  • कोरोना विरोधात सक्रिय लढणारा पहिलाच पक्ष
  • ‘सबका साथ’साठी महाराष्ट्र भाजप अग्रेसर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करावी, असा आदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने गुरुवारी (ता. २६) घेतला.

भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची ऑडिओ ब्रिजद्वारे आज बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक या ऑडिओ ब्रीजला उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपातकालिन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी सुधारणा करण्याची चर्चा यावेळी झाली. येत्या काळात कोअर कमिटी, राज्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर आणि नगराध्यक्ष यांच्याही व्हीडिओ-ऑडिओ बैठका घेतल्या जाणार आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या काळात प्रत्येक गरिब आणि गरजूंना मदत मिळाली पाहिजे. राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. या सेवा कार्यास पोलिसांकडून परवानगी आहे मात्र गर्दी न होऊ देता आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच हे काम करावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात भाजपाची एक हेल्पलाईन सुद्धा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करावी. या माध्यमातून देशभरातील १०५ कोटी लोकांपर्यत आपण पोहोचणार आहोत. ज्या व्यवस्था होत नाहीत, त्या आपण भाजपा म्हणून करायच्या, हाच आपल्या कामाचा ‘मूड’ आणि ‘मोड’ असला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना आदेश

  •  लॉकडाऊनपूर्वी रूग्णालयात दाखल परंतू आता बर्‍या झालेल्या व्यक्तींना घरी पाठविण्याची व्यवस्था
  • बाळंतपण झालेल्या महिलांना प्राधान्याने घरी पोहोचवणे
  •  रूग्णालयातील लोकांच्या भोजनाची व्यवस्था
  •  डॉक्टरांच्या ओपीडी बंद असलेल्या ठिकाणी लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देणे
  •  पोलिसांकडून पत्रकार, शासकीय अधिकारी, आमदार, आपातकालिन सेवा देणार्या घटकांना अटकाव केला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी बोलून त्यावर मार्ग काढणे
  • ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधं आणि गरजूंना रूग्णवाहिकांची सुविधा देणे
  • नियमित डायलिसीस किंवा केमोथेरपीची गरज आहे, अशांना संपूर्ण मदत करणे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य त्या कुटुंबांपर्यंत पोहोचेल, याची काळजी घेणे
  •  झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटाईझरचे वाटप करणे
  •  २० दिवस पुरतील, अशा धान्य आणि आवश्यक सामुग्रींचे पॅकेज गरजूंपर्यंत पोहोचविणे
  •  रस्त्यावर, ड्युटीवर तैनात असलेल्यांची काळजी घेणे.
  •  सफाई कर्मचार्यांच्या आरोग्याकडे विशेषत्त्वाने लक्ष पुरविणे.
  •  धुणी-भांडी, घरकाम करणार्‍या महिलांना तातडीने मदत पुरविणे
  •  किराणा दुकानदार, आटाचक्की येथील गर्दी टाळून तेथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळण्यास मदत करणे.
  • तसेच काही किराणा दुकानदारांकडून होणार्या काळाबाजाराला आळा घालणे
  •  परप्रांतीय मजूरांना जेवण, रोजगाराची काळजी घेणे. ज्या ठिकाणी ठेकेदार त्यांना वेतन देण्यास तयार नसतील, तेथे समाजातील
    दानशूरांच्या मदतीने व्यवस्था करणे
  •  काही स्थानिक लोक अन्य राज्यात, शहरांमध्ये प्रवासासाठी गेले होते. त्यांना तेथेच थांबण्यास सांगून आपल्या तेथील कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या खुशालीवर लक्ष ठेवणे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात