निर्भयाचे गुन्हेगार पोहोचले आंतरराष्ट्रीय न्यायालयात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींच्या फाशी प्रकरणामध्ये आता नवे वळण लागले आहे. फाशी रोखण्यासाठी देशातले सर्व पर्याय संपले असताना आता या गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली आहे. पवन, अक्षय आणि विनय या तिघांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये याचिका दाखल केली आहे. निर्भयाच्या अमानुष हत्या आणि बलात्कार प्रकरणी तिच्या चारही गुन्हेगारांना 20 मार्च रोजी फासावर लटकवले जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने 23 मार्च रोजी गृहमंत्रालयच्या अपीलवर सुनावणी घेणार आहे. यामध्ये निर्भयाच्या दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती.

ल्यूटियन्स मानवतावादाचा ढोंगी आक्रोश, निर्भयाच्या गुन्हेगारांच्या माता-पित्यांचे राष्ट्रपतींना साकडे

बलात्कार आणि निर्घृण हत्येची पीडित निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशीच्या दोरातून सुटका व्हावी यासाठी ल्यूटियन्स पुरोगाम्यांनी आज एक नवा डाव टाकला आहे. मृत्त्युदंडापासून बचावण्याचे कायदेशीर सर्व मार्ग अधिकृतरित्या संपुष्टात आल्यानंतर आता गुन्हेगारांनी स्वतःच्या आई-वडिलांसह नातेवाईकांच्या ढालीचा वापर सुरू केला आहे.
गुन्हेगारांच्या आई-वडिलांनी मुलाबाळांसह इच्छामृत्युची मागणी करणारा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या भयानक कृत्यात आणि पापात त्यांचे कुटुंबीय सहभागी नव्हते. हे तर खरेच पण मग ज्यांनी बलात्कारासारखा निर्घृण आणि हत्येसारखा नृशंस गुन्हा केला, त्या गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहायचे तरी कारण नाही. पण यामध्ये आणखी एक बाजूही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे यामध्ये निर्भयाच्या गुन्हेगारांचे आई वडील आणि नातेवाईक पुढे येऊन इच्छामरणाची मागणी करत असले तरी त्यांनी हातात धरलेले फलक वेगळीच स्टोरी सांगतात. एक खून के बदले पाच खून नही सहेंगे, हे फलक वेगळाच अंगुलीनिर्देश करतात आणि तो अर्थातच ल्यूटियन्स दिल्लीतल्या कथित पुरोगामी मानवतावाद्यांकडे आहे. गुन्हेगारांची मान फाशीच्या फंद्यातून सोडविण्यासाठी याच पुरोगामी धेंडांचा जीव तळमळतो. आणि आता कायदेशीर पर्याय संपले आहेत, तेव्हा गुन्हेगारांच्या आई वडील आणि नातेवाईकांची ढाल पुढे करून हे ल्यूटियन्स पुरोगामी पुढे सरसावले आहेत. गुन्हेगार फासावर चढवले गेले तर त्यांच्या आई वडिलांकडे आणि छोट्या भावंडांकडे कोण पाहणार, असा ढोंगी मानवतावाद या पुरोगाम्यांनी मांडला आहे. या पेक्षा दुसरे काही नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात