डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारली डब्ल्यूएचओची धुरा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरस विरोधातील लढाईचे अग्रभागी राहून नेतृत्व करणारे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कारभाराचीही धुरा सांभाळली आहे. संघटनेतील महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्य असलेल्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. हर्ष वर्धन यांची नियुक्ती झाली आहे. जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी जगभरात चीनी व्हायरसने मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर चीनी व्हायरसने उद्भावलेले संकट दूर करण्यासाठी जागतिक पातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गेल्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियायी गटाने एकमताने कार्यकारी मंडळावर तीन वर्षांसाठी भारताची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची सुरुवात मेमध्ये करण्यात येणार होती. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्षपद एक वषार्साठी आळीपाळीने येते. शुक्रवारपासून सुरू झालेल्या प्रथम वर्षात भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळावर अध्यक्षपदी असेल, असा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता.

आरोग्य सभेच्या निर्णयांची आणि धोरणांची अंमलबजावणी करणे आणि कामकाज सुरळीत करण्यासाठी सल्ला देणे ही प्रमुख कामे कार्यकाळी मंडळावर असतात. चीनच्या वुहान शहरात चीनी व्हायरसला कारणीभूत विषाणूची उत्पत्ती आणि बीजिंगने याबाबत उचललेल्या पावलांबाबत चौकशी करण्याची मागणी जोर धरत असताना भारताने कार्यकाळी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात