चीनी व्हायरसच्या संकटाच्या सर्वाधिक संकटात ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक भेट दिली असून प्रधानमंत्री वय वंदना योजनेची मुदत वाढविली आहे.
प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसच्या संकटाच्या सर्वाधिक संकटात ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक भेट दिली असून प्रधानमंत्री वय वंदना योजनेची मुदत वाढविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री वय वंदना योजने’ला तीन वर्षांसाठी वाढवून मार्च 2023 पर्यंत करण्याची मंजुरी मिळाली आहे. ही स्कीम यावर्षी 31 मार्चला संपली होती.
या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी रक्कम गुंतवून दर महिन्याला पेन्शन मिळविता येते. यामध्ये 10 वर्षांसाठी कमीत कमी 8 टक्के रिटर्नची गॅरंटी दिली जाते. वार्षिक पेंशनचा पर्याय निवडल्यावर 10 वर्षांसाठी 8.3 टक्के व्याजची गॅरंटी दिली जाते. त्याचबरोबर मृत्यूपश्चात फायदाही या योजनेद्वारे मिळतो. त्यानुसार मृताच्या वारसाला गुंतवलेली सर्व रक्कम परत मिलते. ही योजना सुरूवातील खूप कमी कालावधीसाठी खुली होती. मात्र, चीनी व्हायरसच्या संकटामुळे पंतप्रधानांनी त्याची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही मुदत तीन वर्षांसाठी वाढविली आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक एकरकमी रक्कम गुंतवू शकतात. महिन्यापासून ते तीन महिने, सहा महिने, वर्ष असे विविध पर्याय पेन्शनसाठी निवडता येतात. किमान दीड लाख रुपये गुंतवल्यावर दर महिना पेन्शनचा पर्याय निवडता येतो. सध्या चीनी व्हायरसच्या संकटामुळे आर्थिक संकट आले आहे. बॅँकांनी व्याजदर कमी केले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आशादायी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App