गोव्याच्या डॉक्टरांसाठी नौदलाचे खास डोनियर विमान पुण्याला


  • कोविडची चाचणी
  • नौदलाच्या खास विमानाने रवाना

वृत्तसंस्था

वास्को : ‘कोविड १९’ ची चाचणी गोव्यात घेता यावी यासाठी गोव्याच्या आरोग्य खात्याचे चार डॉक्टरांचे पथक बुधवारी (ता. २५) प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. नौदलाच्या खास डोनियर विमानाने हे डॉक्टर पुण्याला गेले.

गोवा वैद्यकिय इस्पितळाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सावीयो रॉड्रीगीस आणि अन्य तीन डॉक्टर हे प्रशिक्षण घेणार आहेत.
डॉक्टरांच्या या पथकाला नौदलाच्या विमानाने पुण्याला घेऊन जावे, अशी विनंती गोवा सरकारने भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फि लीपिनोझ पायनमुत्तील यांना मंगळवारी केली होती.

नौदलाच्या गोवा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, गोवा सरकारच्या विनंतीनंतर नौदलाने त्वरीत पावले उचलली आणि बुधवारी (ता. २५) सकाळी नौदलाच्या ‘आयएनएस हंन्सा ’ या उड्डाणपट्टीवरून डोनियर विमानाने डॉक्टरांच्या पथकाला घेऊन पुण्याच्या दिशेने उड्डाण घेतले. डॉक्टरांचे पथक प्रशिक्षण घेतल्यानंतर ता. २७ मार्चला गोव्याला परतण्याची शक्यता आहे.

पुण्याला रवाना झालेल्या या पथकाने गोव्यातील काही संशयित ‘कोविड १९’ (कोरोना विषाणू) रुग्णांचे नमुने चाचणीसाठी सोबत नेले आहेत. नौदलाच्या याच विमानाने डॉक्टरांचे पथक पुन्हा गोव्यात दाखल होणार आहे. त्यानंतर गोव्यात कोविड (कोरोना विषाणू) चाचणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात