आकडे लपविण्याचा मुंबई, कोलकाता Pattern

कोलकत्याचे नेतृत्व फक्त आणि फक्त पैसे मागण्यासाठी दिल्लीला भेटते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. मुंबईतील नेतृत्वाचे तसे नाही. कोरोनाच्या आव्हानाच्या सुरवातीला तरी या नेतृत्वाने राजकीय प्रगल्भता दाखवली. महाराष्ट्रात आणि केंद्रातही छाप पाडली. दिल्लीशी संपर्क, संवाद ठेवला. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे नियंत्रणात होते, तो पर्यंत नेतृत्वाची प्रगल्भता “टिकून” होती. पण… मुंबईतील आकड्यांची गडबड जसजशी बाहेर यायला लागली, तेथील परिस्थितीवरची पकड सुटायला लागली, लोकांना शंका येऊ लागली तसतशी मुंबईतील नेतृत्वाची राजकीय प्रगल्भता “निसटायला” लागली.


विनय झोडगे

चीनी व्हायरस कोरोनाग्रस्तांचे आकडे लपविण्याच्या pattern मध्ये मुंबई आणि कोलकाता या दोन महानगरांमधील विलक्षण साम्य सामोरे येते आहे. तंत्र भिन्न, ठिकाणे भिन्न पण आकडे लपविण्यामागची मूलभूत प्रवृत्ती दोन्हीकडे सारखीच दिसते आहे, ती म्हणजे आपल्या राजकीय प्रभावक्षेत्रात कोरोनाला अटकाव करण्यात आलेले अपयश झाकण्याची…!!

मुंबई आणि कोलकाता दोन्हीकडचे नेतृत्व भिन्न राजकीय प्रकृती आणि प्रवृत्तींचे. दोघेही भिन्न राजकीय संस्कृतीतून आलेले आणि पोषण झालेले. पण दोन्ही नेतृत्वांमध्ये एक समान राजकीय गुण आहे, तो म्हणजे हेकटपणा अथवा हेकडी…!! अर्थात या हेकडीच्या shades नक्कीच वेगवेगळ्या आहेत. कोलकत्यात त्या अधिक गहिऱ्या म्हणजे dark आहेत, तर मुंबईत त्या सौम्य म्हणजे faint आहेत. दोन्हीकडची कार्यशैलीही भिन्न आहे… पण दोन्ही नेतृत्व आपल्याला आव्हांनाचा वाराही लागू देत नाहीत किंवा खपवून घेत नाहीत.
या पैकी कोलकत्यातील नेतृत्व कोणालाच जुमानत नाही. त्या अर्थाने “झुगारू” नेतृत्व आहे. ते स्वत:ला मूळातच कोणाला उत्तरदायी असल्याचे मानत नाही. दिल्लीला ते कधी reporting करणार नाही पण पैसे मागायला हात पुढे करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. कोलकत्याचे नेतृत्व फक्त आणि फक्त पैसे मागण्यासाठी दिल्लीला भेटते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

मुंबईतील नेतृत्वाचे तसे नाही. कोरोनाच्या आव्हानाच्या सुरवातीला तरी या नेतृत्वाने राजकीय प्रगल्भता दाखवली. महाराष्ट्रात आणि केंद्रातही छाप पाडली. दिल्लीशी संपर्क, संवाद ठेवला. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे नियंत्रणात होते, तो पर्यंत नेतृत्वाची प्रगल्भता “टिकून” होती. पण… मुंबईतील आकड्यांची गडबड जसजशी बाहेर यायला लागली, तेथील परिस्थितीवरची पकड सुटायला लागली, लोकांना शंका येऊ लागली तसतशी मुंबईतील नेतृत्वाची राजकीय प्रगल्भता “निसटायला” लागली. त्यातच पालघरचे प्रकरण उद्भवले. सहकारी पक्षाने मूळचे मस्तीखोर रंग दाखवून जबाबदारी झटकायला सुरवात केल्याबरोबर मुंबईतील नेतृत्वाचा रंग “उतरायला” सुरवात झाली… त्याचमुळे मुंबईतील आकडे झाकण्याची गरज निर्माण झाली. मुंबईतील खरे आकडे बाहेर आले तर अपयश उघडे पडेल. सत्तेच्या पोपटाचे प्राण मुंबई महापालिकेत आहेत. ते कासावीस व्हायला सुरवात झाली आहे. त्यातूनच मुंबईतील आकडे झाकण्याचा आटापिटा सुरू आहे.

कोलकत्याच्या नेतृत्वाला मूळातच सध्याची दिल्ली नको आहे. कोरोनाग्रस्तांचे खरे आकडे बाहेर आले तर त्याची मूळापासून scrutiny व्हायला सुरवात होईल. त्यात CAA, NCR हे मुद्दे मिसळले जातील. त्यातून दिल्लीचा हस्तक्षेप वाढेल आणि नेतृत्वाची कोलकत्यावरील पकड ढिली होईल. कोरोनाच्या निमित्ताने खरी माहिती बाहेर आली तर अपयश उघड्यावर येईल आणि नेतृत्वाची पकड ढिली होईल…!! कोरोनापेक्षा ही भीती दोन्हीकडच्या नेतृत्वाला ग्रासते आहे. ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात