स्मृती इराणी यांनी मास्क बनविण्यासाठी हाती घेतला सुई-दोरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत उतरले आहे. प्रत्येक जण काहीतरी काम करत आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी हातात सुई- दोरा घेऊन घरच्या घरी मास्क कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. धर्मेंद्र प्रधान यांची पत्नी मृदुला आणि नैमिषा, नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन या देखील मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत.


विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत उतरले आहे. प्रत्येक जण काहीतरी काम करत आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी हातात सुई- दोरा घेऊन घरच्या घरी मास्क कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले.चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईत सोशल डिस्टन्सिंगचे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क वापरण्याचाही सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरात मास्कशिवाय घराबाहेर पडल्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, बाजारात मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात मास्क मिळाला नाही तर घरच्या घरी मास्क बनवू शकतो, असे इराणी यांनी सांगितले आहे.

मास्क बनविण्याचे प्रात्यक्षिकच त्यांनी सोशल मीडियावर दिले आहे. यामध्ये घरच्या घरी मास्क कसे बनवायचे असे स्मृती इराणी यांनी शिकविले आहे. त्यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत.त्यात मास्क बनविण्याचे प्रात्यक्षिक आहे. इराणी म्हणतात, घरच्या घरी सुई-दोर्याने कोणीही मास्क बनवून शकतो.

नितीन गडकरी यांची पत्नी कांचन मास्क करताना

याचबरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संपूर्ण कुटुंब मास्क बनविण्याचा कामात व्यस्त आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी घरच्यांसाठी आणि इतर गजरवंतासांठी मास्क बनवित आहेत. याबाबत धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटवरून सांगितले की माझी पत्नी मृदुला आणि मुलगी नैमिशा घरात बसून मास्क बनवित आहेत. या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी योगदान द्यायला हवे.

धर्मेंद्र प्रधानांची पत्नी आणि मुलगी स्वत: मास्क करताना

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची पत्नी नौनन्द कंवर याही मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या मुलीही त्यासाठी मदत करत आहेत. त्या दररोज ६० ते ७० मास्क बनवित आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात