सौदी अरेबियातही एकत्र यायला बंदी, तुम्हीही घरात पढा नमाज : मुख्तार अब्बास नक्वी

सौदी अरेबियासह बहुतांश मुस्लीम देशांनीही रमझानच्या महिन्यात धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित यायला प्रतिबंध केला आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांनीही नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी घरात राहूनच करावेत. त्यासाठी मशीदी आणि अन्य धार्मिक स्थळांवर जमू नये, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.


विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : सौदी अरेबियासह बहुतांश मुस्लीम देशांनीही रमझानच्या महिन्यात धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित यायला प्रतिबंध केला ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांनीही नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी घरात राहूनच करावेत. त्यासाठी मशीदी आणि अन्य धार्मिक स्थळांवर जमू नये, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रमझानच्या पवित्र महिन्यात, लॉकडाऊन आणि सामजिक अंतरासंदभार्तील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी, नक्वी यांनी विविध धार्मिक नेते, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थाचे प्रतिनिधी, राज्य वक्फ मंडळाचे अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. नक्वी हे भारतातील राज्य वक्फ मंडळाच्या नियामक मंडळाच्या केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. देशभरातील 7 लाखांहून अधिक नोंदणीकृत मशिदी, इदगाह, इमामवाडा, दर्गा आणि इतर धार्मिक संस्था या राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीखाली येतात अशी माहिती त्यांनी दिली.

नक्वी म्हणाले की, रमझानच्या पवित्र महिन्यात कोणत्याही परिस्थितीत लोक धार्मिक आणि इतर ठिकाणी जमा होणार नाहीत हे पाहण्यासाठी केंद्रीय वक्फ परिषदेने, राज्य वक्फ मंडळाला ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात, विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था, लोक आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या धार्मिक आणि सामाजिक संस्था तसेच व्यक्तींना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देश गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे लॉकडाऊन आणि सामाजिक अंतरांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हा आपल्यासाठी, आपले कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशासाठी हानिकारक ठरू शकतो.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात