वृत्तसंस्था
नवी दिल्ली – आत्तापर्यंत काँग्रेसचे तरूण नेते समजले जाणारे सचिन पायलट आता तरूण नेते राहिलेले नाहीत, तर ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बनले आहेत. काँग्रेसच्याच नेत्याच्या वक्तव्यातून हा खुलासा झाला आहे. Sachin Pilot is a senior leader & an asset to the party
सचिन पायलट यांना ज्येष्ठ नेतृत्वाचा मान देणारे हे कोणी साधे काँग्रेस नेते नाहीत. ते आहेत माजी केंद्रीय शहरी विकासमंत्री अजय माकन. अजय माकन सध्या राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनीच सचिन पायलट यांना ज्येष्ठ नेते असे संबोधले आहे.
सचिन पायलट यांनी म्हणे प्रियांका गांधी यांची अपॉइंटमेंट मागितली होती. पण त्यांना ती मिळाली नाही. म्हणजे तशा बातम्या तरी पसरल्या होत्या. पण त्यावर अजय माकन यांनी खुलासा केला आहे. त्यात ते म्हणाले, की सचिन पायलट हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे ऍसेट आहेत. त्यांनी कोणा नेत्याची अपॉइंटमेंट मागितली आणि त्यांना ती कोणी दिली नाही, हे संभवतच नाही. प्रियांका गांधी या सचिन पायलट यांच्याशी बोलल्या आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि अन्य नेते देखील सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत.
काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी सचिन पायलट दिल्लीत पोहोचले होते. पण त्यांना गांधी परिवारापैकी कोणाचीही भेट मिळाली नाही. त्यामुळे त्यांना तसेच हात हलवत जयपूरला परत यावे लागले होते. अशा बातम्या आल्या होत्या.
राजस्थात अशोक गेहलोत सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यामध्ये आपल्या समर्थकांना स्थान मिळावे, अशी सचिन पायलट यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस हायकमांडला भेटण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्षात त्यांना भेट मिळू शकली नसल्याच्या बातम्या आहेत. त्यावर पक्षप्रभारी अजय माकन यांनी वरील खुलासा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more