मालेगाव हॉटस्पॉट ! मालेगाव शहरात आणखी सापडले ९ करोना पॉझिटिव्ह


  • मालेगावात करोना पॉझिटिव्ह रूग्णांनी संख्या ११० तर नाशिक जिल्ह्यात १२४ रूग्ण

विशेष प्रतिनिधी

मालेगाव :  मालेगाव शहरात करोनाचे थैमान सुरू असून आताच मिळालेल्या माहितीनुसार आणखी ९ करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मालेगाव शहरातील रुग्णांनी आज सकाळी शंभरी गाठली होती.

आज सकाळी एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळून आल्याने ही संख्या १०१  पोहचली होती. आता त्यात ९ रूग्णांची भर पडली असून हा आकडा आता ११० वर पोहचला आहे. यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगाव शहरात आहे.

येथील करोना बाधितांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करत असली तरी अजूनपर्यंत या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. नाशिक जिल्ह्यातील आकडा आता १२४ वर गेला असून यात नाशिक शहरातील १० तर इतर तालुक्यातील ४ करोनाबाधित रूग्ण आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था