ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. ऑनलाइन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जी वस्तू आपल्या गावात किंवा शहरात मिळत नाही, तिची खरेदी करणे यामुळे शक्य होते. Advantages of online shopping – Identify the disadvantages and then start talking
वेबसाइटमुळे आपण केव्हाही अगदी रात्रीही ऑनलाइन खरेदी करू शकतो. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर त्यांच्या किंमतीमधील तुलना करू शकतो. स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो वस्तू ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचाही समावेश आहे. ऑनलाइन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे.
ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहे, तसेच तोटेही आहेत. ऑनलाइनवरील वस्तूंच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्व ती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकतात. याउलट वस्तू ऑनलाइन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. पारंपरिक दुकानांमधून घेतलेली वस्तू वॉरंटी अंतर्गत परत करणे सहज सोपे असते;
परंतु या उलट ऑनलाइन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या दर्जाबाबत खात्री करून घेत असतो. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टसची विक्री करणार्याी तिसर्याल पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवत नाही.
या उलट ऑनलाइन वस्तू जरी आकर्षक व चमकदार वाटत असली, तरीही प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. ऑनलाइन खरेदीमध्ये वाहतुकीचा खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा शिपिंगचा म्हणजेच वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक केली पाहिजे व चार पैसे वाचविले पाहिजेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App