चित्रपटामध्ये खलनायकाचे काम करणारा अभिनेता सोनू सूद प्रत्यक्ष जीवनात हिरोपेक्षा मोठे काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना घरी पाठविण्यासाठी सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे त्याला अक्षरश: देवत्व प्राप्त झाले आहे. त्याचा पुतळा उभारण्याची तयारी सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: चित्रपटामध्ये खलनायकाचे काम करणारा अभिनेता सोनू सूद प्रत्यक्ष जीवनात हिरोपेक्षा मोठे काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना घरी पाठविण्यासाठी सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे त्याला अक्षरश: देवत्व प्राप्त झाले आहे. त्याचा पुतळा उभारण्याची तयारी सुरू आहे.
लॉकडाउनच्या काळात मुंबईमध्ये अडकलेल्या आणि गावी जाऊ इच्छिणाऱ्यांना सोनूने मदतीचा हात दिला. बसची व्यवस्था करून त्याने श्रमिकांना त्यांच्या गावी, म्हणजे कर्नाटक, उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम आणि बिहार अशा राज्यांमध्ये पोहोचविले आहे.
येत्या दहा दिवसांत आणखी शंभरहून अधिक बसेसची व्यवस्था करून श्रमिक मंडळींना तो त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे कामगार आणि विद्यार्थ्यांनी त्याला देवदूताच्या रुपात पाहण्यास सुरूवात केली आहे.
सोनूने म्हटले आहे की, संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाला आपल्या परिवारासोबत राहण्याचा हक्क आहे. अडकलेल्या प्रत्येकाला त्याच्या घरी पोहोचवित नाही, तोपर्यंत हे काम सुरू ठेवणार आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून उत्तर प्रदेशात अक्षरश: त्याचा पुतळा बनविण्याचे काम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘बिहारमधील सिवान जिल्ह्यात लोकं तुमचा पुतळा बनवण्याच्या तयारीत आहेत, सलाम तुमच्या कामाला’, अस ट्विट एका चाहत्याने केले आहे.
यावर सोनूने अत्यंत भावपूर्ण उत्तर दिले आहे. तो म्हणतो, माझ्या पुतळ्यावर होणारा खर्च गरजूंच्या मदतीसाठी वापर. सोनूची मैत्रीण निती गोयलच्या बरोबरीनं ‘मित्र पाठवा’ या उपक्रमाला सुरुवात झाली. सोनूच्या ट्विटर अकाऊंटवर त्याला टॅग करून आलेल्या पोस्टला उत्तर देताना, ‘काळजी करू नका. मला तुमची माहिती पाठवा, लवकरच तुम्ही घरी जाल’ असं सांगणारी पोस्ट तो करतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App