भाजपा महिला आघाडी तयार करणार 25 लाख मास्क

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 25 लाख मास्कची घरोघरी निर्मिती करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचा निर्धार मंगळवारी व्यक्त करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिला खासदार-आमदार, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी महिला कार्यकर्त्याना हे ‘मिशन’ दिले. या संवादसेतुमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, माधवी नाईक सहभागी झाले होते.

बहुतेक महिला पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर फडणवीस यांनी याबाबत आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचे सांगितले. केंद्र सरकारचे आरोग्य ॲप वापरण्यासंबंधी सुद्धा अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना केल्या.

महिला कार्यकर्त्यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच या संवाद सेतु मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्कचा तुटवडा भरुन काढता येईल, असा विश्वास महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात