बलिदान विसरणार नाही; हंदवाड्यातील शहीदांना पंतप्रधानांची श्रध्दांजली


काश्मीर खोर्‍यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काश्मीर खोर्‍यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी ट्विटद्वारे जवानांना श्रध्दांजली अपेण केली आहे. ते म्हणतात, हंदवाडा चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली, त्यांचा पराक्रम आणि बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांनी पूर्णपणे निष्ठेने देशाची सेवा केली. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविश्रांत मेहनत घेतली.

हंदवाडा येथे  दहशतवादी घुसलेल्या भागात राहणार्‍या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे पाच जवान एका पोलीस जवानासह गेले होते. त्यांनी  नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढले. मांत्र, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, दोन लष्करी अधिकार्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर असे पाच जण शहीद झाले.

यामध्ये  २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाले. दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले होते.

दहशतवाद्यांविरोधात लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल दोन वेळा कर्नल आशुतोष शर्मा यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मागच्या पाच वर्षात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले कर्नल रँकचे ते पहिले अधिकारी आहेत.

एकदा कर्नल आशुतोष शर्मा जवानांसह  रस्त्यावर असताना एक दहशतवादी कपडयांमध्ये ग्रेनेड लपवून त्यांच्या दिशेने येत होता. शर्मा यांनी लगेच त्याची चाल ओळखली व क्षणाचाही विलंब न लावता आपली बंदूक काढली व त्या दहशतवाद्याला तिथेच कंठस्नान घातले. आशुतोष शर्मा यांच्या सतर्कतेमुळे युनिटमधील जवानांचे आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्राण वाचले. यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती