पालघर साधू हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई


पालघर येथील तीन साधुंच्या हत्याकांडाप्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गौरव सिंह यांच्याकडील पदभार अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सोपवत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

पालघर : पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गौरव सिंह यांच्याकडील पदभार अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

गडचिंचले गावात तीन साधुंची जमावाने निर्घृण हत्या केली होती. चोर समजल्याच्या गैरसमजातून ही हत्या झाल्याचे पहिल्यांदा सांगितले जात होते. मात्र या हिंदु साधुंची हत्या करण्यासाठी विशिष्ट लोकांनी भडकावले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली होती.

गृहमंत्री देशमुख यांनी गुरूवारी गडचिंचले गावात जात घटनास्थळाचा आढावा घेतला व स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरण, पोलीस अधीक्षक गौरव सिंह, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, स्थानिक सरपंच या सर्वांची मतेही त्यांनी जाणून घेतली.

तिथून मुंबईत परतल्यानंतर त्यांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलत पोलीस अधीक्षकांची सक्तीच्या रजेवर पाठवणी केली आहे.
पालघरमध्ये जे घडले ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण