निवडणुका लढायच्यात, सेवाभावी कार्य करा, उत्तर प्रदेश भाजपाचा मंत्र


सर्वाधिक सेवाकार्य करण्याचा दावा करणारी शिवसेनेची संघटना चीनी व्हायरसच्या संकटात निपचित पडून आहे. मात्र, उत्तर प्रदेशात भाजपाने कार्यकर्त्यांना सेवाभावी कार्यात जुंपून एक आदर्श निर्माण केला आहे. निवडणुकांसाठी इच्छुकांना त्यांच्या सेवाकार्य दाखवावे लागणार आहे.


वृत्तसंस्था

लखनऊ : संपूर्ण देशातील इतर पक्षांची राजकीय यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली असताना भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांना सेवाभावी कार्यासाठी जुंपले आहे. उत्तर प्रदेशात तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायच्या असतील तर चीनी व्हायरसविरुध्द सेवाकार्यात सहकार्य करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात चीनी व्हायरसच्या संकटात योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण शक्तीनिशी काम सुरू केले आहे. आगामी पंचायत स्तरावरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांना सेवाकार्यासाठी प्रेरीत करण्यात येत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि ब्रिजकॉलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मदतगट बनविण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सेवाकार्यात सहभागी होणार्यांना स्वत:साठी किंवा कुटुंबातील कोणाला उमेदवारी मागण्यापासून मनाई करण्यात आली आहे.

पंचायत निवडणुकांचे प्रभारी विजय बहादूर पाठक यांनी सांगितले की, प्रत्येक गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीनिशी पंचायत निवडणुकांत उतरणार आहे. मात्र, त्यापूर्वी कार्यकर्त्यांना बुथ आणि सेक्टर पातळीवर मदतकार्य करावे लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाने गावपातळीवर मदतीसाठी मंत्र्यांचा गट तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सेवाभावी कार्यात जोडले जात आहे. यामध्ये माजी मंत्री, माजी आमदार-खासदार यांचीही मदत घेतली जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण