वृत्तसंस्था
द हेग : संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय बनलेला कोविड -१ विषाणू नेदरलँड्सच्या सांडपाण्यात सापडला असल्याचे रिव्हआयएम नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थने स्पष्ट केले आहे.
कोविड -१९ ची लागण झालेल्या रूग्णांच्या अन्न मार्गात या विषाणूने प्रवेश केला असावा. त्यामुळे या रुग्णांच्या विष्ठेतून, शौचालयामार्गे हा विषाणू गटारात आणि नंतर सांडपाण्यात आला असणार, असे उघड होत आहे. विशिष्ट भागात या विषाणूची लागण किती पसरली आहे, हे तपासण्यासाठी आता संबंधित भागातील सांडपाण्याचे निरिक्षण करावे लागेल, असे संशोधकांनी सूचित केले आहे.
‘आरआयव्हीएम’ने यापूर्वी सांडपाण्यातील नॉरोव्हायरस, प्रतिजैविक-प्रतिरोधक जीवाणू, पोलिओव्हायरस आणि गोवर विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी हा दृष्टिकोन वापरला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात काम करणार्या कर्मचार्यांनी स्वच्छता नियमांचे अनुसरण न केल्यास त्यांना कोरोना सारख्या विषाणूजन्य संक्रमणाचा तीव्र धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
आण्विक पद्धतींचा वापर केल्यानंतर एमस्टरडॅमचा शिपोल विमानतळ, टिल्बर्गमधील सांडपाणी आणि कात्शेवेलमधील सांडपाणी प्रक्रिया संयंत्रात कोरोना विषाणू आढळला. नेदरलँड्समध्ये कोविड -१९ चा पहिला रुग्ण राहत असलेल्या शहरात लून ऑप झांड येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे.
१७ फेब्रुवारी २०२० पासून, शिपोल विमानतळावर सांडपाण्याचे साप्ताहिक नमुने घेण्यात आले. पहिल्या दोन आठवड्यांत, कोरोना विषाणू सापडला नाही. मात्र, २, ९ आणि १६ मार्च रोजी घेतलेल्या विमानतळाच्या सांडपाणी नमुन्यांमध्ये व्हायरसमधील अनुवांशिक सामग्री आढळली. २७ फेब्रुवारीला नेदरलँड्समधील पहिल्या व्यक्तीने कोविड -१९ साठीची चाचणी घेतल्यानंतर चार दिवसांनी विषाणू असलेले नमुने सापडले. ३, १० आणि १७ मार्चला टिलबर्गमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून घेतलेल्या सांडपाणी नमुन्यांमध्ये कोरोना आढळून आला.
संरक्षणात्मक उपाय मागील संशोधनात असे दिसून आले आहे की सांडपाणी प्रक्रिया करणार्या प्रकल्पातील लोकांसाठी आधीपासूनच मानक असलेल्या संरक्षणात्मक उपायांमुळे रोगजनकांपासून पुरेसे संरक्षण मिळते. कोरोना विषाणूविरूद्ध देखील हे उपाय प्रभावी आहेत. सांडपाण्यावर काम करतात त्यांनी सांडपाण्याशी थेट संपर्क साधला पाहिजे आणि सांडपाणी गिळणे किंवा स्प्रे वा धुक्यातून ते श्वासात जाणे टाळले पाहिजे. सांडपाण्याशी संबंधित काम करणार्यांना संरक्षक कपडे, हातमोजे, बूट्स, सेफ्टी ग्लासेस, फेस मास्क किंवा एफएफपी 3 श्वसनयंत्र मुखवटा यासह वैयक्तिक संरक्षक उपकरणे देणे अत्यावश्यक आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील कर्मचार्यांनी चांगल्या प्रकारे हाताची स्वच्छता राखली पाहिजे,, डोळे, नाक किंवा तोंडाला हात लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हात न धुता खाणे-पिणे टाळले पाहिजे.
हे आहे धक्कादायक डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोविड -१९ चा उद्रेक झाल्यानंतर नेदरलँड्समधील पहिला रूग्ण २७ फेब्रुवारी २०२० ला आढळून आला. कोरोना रूग्णांपैकी थोड्या लोकांना अतिसाराचा त्रास होता. यातल्या काही रूग्णांच्या विष्ठा नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App