जागतिक भांडवलशाही आणि जागतिक साम्यवाद तोकडे पडले; स्वदेशी विकास मॉडेलची गरज : संघाची धारणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसचा धोका ओळखण्यात आणि प्रादूर्भाव रोखण्यात जागतिक भांडवलशाही आणि जागतिक साम्यवादी दोन्ही मॉडेल तोकडी पडली, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले. परदेशी मीडियाशी ते विडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते.

कोविड १९ च्या जागतिक प्रादूर्भावाने जागतिकीकरणातली भांडवलशाही, जागतिक साम्यवादी विकास मॉडेल या दोन्हींच्या मर्यादा स्पष्ट केल्या, असे सांगून होसबळे म्हणाले, “आता सर्वच देशांनी विशेषत: भारताने स्वदेशी विकास मॉडेलकडे वळले पाहिजे. भारताने स्थानिक वर्कफोर्स, स्थानिक कौशल्य यांचे रूपांतर औद्योगिक, शेती यांच्या आर्थिक विकास मॉडेलमध्ये केले पाहिजे. हा नवा ट्रेंड सेट करायची भारताला मोठी संधी आहे.”

कोरोना व्हायरसचे मूळ, त्याच्या परिणामाची साखळी यांची जागतिक पातळीवरून तपासकाम केले पाहिजे, असे आग्रही मतही त्यांनी व्यक्त केले. कोविड १९ नंतर नवी जागतिक व्यवस्था त़यार होतेय. आतापर्यंत ज्या राजकीय – आर्थिक व्यवस्था प्रणालींनी जगावर राज्य केले आहे, त्या भांडवलशाही आणि साम्यवादी व्यवस्था अपयशी ठरल्या आहेत. एक नवी व्यवस्था जिच्यात “स्थानिक” गरजा, कौशल्य, भांडवल यांना विशेष महत्त्व असेल, अशा व्यवस्था उदयाला येतील. या व्यवस्थांमध्ये जबाबदार व्यक्ती, संघटना आणि देश यांना सहभागी करवून घेतले पाहिजे, असेही होसबळे यांनी स्पष्ट केले.

अनिर्बंध भौतिकवाद आणि चंगळवाद यांच्यापुढे जागतिक पातळीवरच प्रश्नचिन्ह उभी केली पाहिजेत. कारण याच मॉडेलने जगाचा प्रवास नकारात्मकतेकडे झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

भारताने कृषी क्षेत्र आणि सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र स्वयंपूर्ण होण्यावर भर देणारी पावले उचलली पाहिजेत. या दोन्ही क्षेत्रांना packages देताना स्वयंपूर्णवर लक्ष केंद्रीत करता आले पाहिजे, कारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्थानिक भांडवल, कौशल्या यांना मोठ्या प्रमाणाक वाव मिळतो, असेही होसबळे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण