जनता कर्फ्यूला डॉक्टराचा पाठिंबा; साखळी तुटण्यासाठी आवश्यक पाऊल; मोदींवरील टीका अशास्त्रीय

विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. त्यावर काहींकडून अश्लाघ्य शब्दात पंतप्रधानांवर टीका होत असताना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी मात्र जनता कर्फ्युला पाठिंबा दिला आहे. यामुळे कोरोना विषाणूची साखळी तुटण्यासाठी मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रापासून ते बॉलीवूड सेलिब्रिटीनी त्याला पाठिंबा दिला. मात्र एका गटाकडून यावरून टीका करण्यात येऊ लागली आहे. पंतप्रधानांना नासाचे प्रमुख करायला हवे येथपासून वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केले जात आहे.
मात्र साथ रोगातील तज्ञांच्या हवल्याने डॉक्टर मंडळींनी यामागचे शास्त्रीय कारण सांगितले आहे. कोरोना विषाणूचे आयुष्य काही पृष्ठभागांवर १२ तासांपेक्षा कमी आहे आणि जनता कर्फ्यू १४ तासाचा आहे. या १४ तासांमध्ये ज्या-ज्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे विषाणू आहेत अशा ठिकाणी किंवा पॉईंट्सना नक्कीच स्पर्श केला जाणार नाही. त्यामुळे  ही साखळी तुटण्यास मदत होईल.
बरेचजण ऑफिसवरून शनिवारी रात्री घरी पोहोचल्यावर बाहेर पडणार नाहीत. रविवार सकाळपासून जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत लागू होईल. रविवारी रात्री 9 नंतर कर्फ्यू संपला तरी बहुसंख्य जनता घरातून बाहेर पडणार नाही.
म्हणजे  शनिवार रात्रीचे 9 पासून जास्तीत जास्त लोक 24 तास आणि रविवार रात्री 9 पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत असे 10 तास मिळून नागरिक 34 तास घरात असतील.
14 तासाच्या किंवा वरीलप्रमाणे पाहिलं तर 34 तासांच्या जनता कर्फ्युमुळे आपण स्वतःला व आपल्या परिवाराला या विषाणूपासून सुरक्षित करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक विषाणूला जिवंत राहण्यासाठी ‘होस्ट’ लागतो. म्हणजे मानवी शरीर लागते. जनता कर्फ्यूमुळे होस्टशी संपर्कात न आल्याने  विषाणूंच्या फैलावास अटकाव होऊ शकतो. साखळी तुटण्यास मदत होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*