कम्युनिस्ट केरळच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून केंद्राची दिलखुलास स्तुती ; कोरोना काळात मोदी सरकारची झाली मदत


केरळ राज्याने चीनी व्हायरसचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आरोग्य मंत्री टीचर शैलजा यांना त्याचे श्रेय दिले जात आहे. मात्र, शैलजा यांनीही चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाची मदत झाली असल्याचे सांगत केंद्रासोबत आम्ही समन्वयाने काम केल्यानेच हे शक्य झाल्याचे म्हटले आहे.


वृत्तसंस्था

तिरुवअनंतपुरम : केरळ राज्याने चीनी व्हायरसचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. या बद्दल केरळच्या आरोग्य मंत्री टीचर शैलजा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शैलजा यांनी चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाची मदत झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रासोबत समन्वय ठेवून आम्ही काम करत असल्यानेच चीनी विषाणूचा मुकाबला करणे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी आपल्या ‘ऑफ द कफ’ या कार्यक्रमात शैलजा यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी नियमित संपर्क आहे. त्यांच्याकडून सातत्याने विचारपूस केली जात आहे. आयसीएमईआरकडूनही चांगल्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे केरळमध्ये चीनी व्हायरसविरुधदचा लढा यशस्वी होत आहे.

आयुष मंत्रालयाकडून प्रतिकार शक्ती वाढविणारी देशी औषधे सुचविली आहेत. त्यांचा वापर केरळमध्ये सुरू आहे. राज्य आणि केंद्र यांच्या समन्वयातून काम सुरू आहे, सातत्याने केंद्राकडून संपर्क ठेवला जात असून विचारणा होत असल्याचे त्या म्हणाल्या. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे. कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पक्षामध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य असल्याचे सर्वज्ञात असताना केंद्राच्या मदतीबद्दल शैलजा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी देखील याच पद्धतीच्या भावना यापूर्वी व्यक्त केल्या आहेत.

दुसऱ्या बाजुला चीनी विषाणूच्या साथीच्या बाबतीत देशातील हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापासून आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार सातत्याने पंतप्रधान आणि केंद्रावर टीका करत आहेत. मागण्यांचे टुमणे मागे लावत आहे. परंतु, चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी समन्वयाने काम करत नसल्याचे दिसून आले आहे. मुंबई-पु्ण्यात रोज शेकड्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्यात अद्याप तरी राज्य सरकारला यश मिळालेले नाही.

शैलजा यांच्या म्हणण्यानुसार केंद्राशी समन्वय ठेऊन काम केल्यामुळे चीनी व्हायरसने ग्रस्त असलेल्यांची संख्या मर्यादित राहिले. पहिल्या टप्प्यात फैलावणारी कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात केरळला यश आले आहे. बरे होऊन जाणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही केरळमध्ये चांगलीच वाढली आहे. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात मात्र त्यानंतर चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव होऊनही रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या पुढे गेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पुरेसे सुरक्षा साधने न पुरवल्याने डॉक्टर, नर्स, पोलिस हे कोरोना योद्धे चीनी विषाणूग्रस्त होण्याचे प्रमाण देखील महाराष्ट्रात वाढू लागले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात