विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्य सरकारच्यावतीने 26 सप्टेंबरपासून कोल्हापूरमध्ये पर्यटन महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पाककलेची ओळख करून देणे हा हेतू असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच नवरात्र महोत्सव सुरू होत आहेत. त्यानिमित्ताने कोल्हापूरमध्ये भाविकांची गर्दी होणार हे ओळखून पालकमंत्री सतेज पाटील यांनी रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.
On the occasion of upcoming festival, road repair work has started in Kolhapur
तसं पाहायला गेलं तर दिल्ली, मुंबई किंवा पुणेकर सर्वत्रच रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे. पण कोल्हापूरमध्ये सुरू होणार्या नवरात्र उत्साहामुळे हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये येतात.
मंत्रीपदाच्या बळावर क्रुरतेचे राजकारण, उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही, गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचा इशारा
या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, महालक्ष्मी मंदिरासशी जोडले गेलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत एकूण 44 रोड दुरूस्ती चे काम हाती घेण्यात आले आहे. तर बाकी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट देखील रस्त्यांची डागडुजी करण्याचे कामामध्ये सहभागी होत आहेत.
सध्या पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. अधूनमधून पाऊस येतच आहेत. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून हे काम फुल फ्लेजने चालू करण्याचा विचार आहे. असे यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App