“ती”च्या सर्जनशील आत्मशक्तीचा जागर; “द फोकस इंडिया”कडून ३ कर्तृत्वशालिनींना दुर्गा सन्मान पुरस्कार; औरंगाबादेत रविवारी रंगणार सोहळा


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद – समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान, तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणून हा दुर्गा सन्मान स्त्रीशक्तीला आम्ही “द फोकस इंडिया”च्या वतीने समर्पित करीत आहोत…!!Durga Sanman Award; The ceremony will be held in Aurangabad on Sunday

स्त्रीच्या आत्मशक्तीचा जागर करणारा “द फोकस इंडिया”च्या वतीने देणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, एडव्होकेट डॉ. कल्पलता पाटील भारसवाडकर आणि वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील अँबॅसिडर अजंठा हॉटेलमध्ये रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या समारंभात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते वरील तीनही महनीय व्यक्तींना द फोकस इंडियाचा दुर्गा सन्मान प्रदान करण्यात येईल.

हा नुसत्या वेद – पुराणांचा काळ नाही, तर एकविसाव्या शतकाचा हा आधुनिक भविष्यवेधी काळ आहे. परंतु, याच्या प्रेरणा वेद, शास्त्रे आणि भारताच्या कृषी, वैज्ञानिक संस्कृतीशी घट्ट नाळ जोडणाऱ्या आहेत. या संस्कृतीतूनच प्रेरणा घेऊन भारतीय स्त्रीशक्तीने आपल्या कर्तृत्वाचा ध्वज जागतिक क्षितिजावर फडकावला आहे. उंचावला आहे. भारतीय स्त्रीशक्तीचे कर्तृत्व स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात तळपत आहे. या स्त्रीशक्तीचा आम्ही “द फोकस इंडिया”च्या वतीने सन्मान करत आहोत.

ही फक्त पुष्प मंडित पूजा नाही, तर स्त्रीशक्तीला समाजातल्या अन्यायाविरूद्ध, सामाजिक कु रीती, कु प्रथांविरुद्ध लढण्याचे बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. नुसत्या स्त्री-पुरुष समानतेचा तोंडी घोष करण्याचा हा प्रकार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी उदाहरण घालून देणाऱ्या महनीय व्यक्तींचा हा सन्मान आहे. स्त्रीमधल्या सर्जनशील आत्मशक्तीचा हा जागर आहे. हा जागर करताना “द फोकस इंडिया”ला धन्यता वाटत आहे.

Durga Sanman Award; The ceremony will be held in Aurangabad on Sunday

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात