टीना डाबी यांनी देशातील पहिला कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनलेल्या राजस्थानातील भिलावडा येथे आदर्शवत उपक्रम राबविले. देशात लॉकडाऊन होण्यापूर्वीच भिलावडा येथे संचारबंदी लागू केली. हॉटस्पॉट बनलेला जिल्हा नंतर कोरोनामुक्तीचे रोल मॉडेल म्हणून उदयास आला. Bhilawada in Rajasthan became the first corona ‘hotspot’; But, due to Tina Dabi district became the ‘role model’ for others
विशेष प्रतिनिधी
भिलावाडा : राजस्थानातील भिलावडा जिल्हा देशातील पहिला कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनला होता. परंतु, आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी प्रभावी उपाययोजना राबविल्यामुळे हा जिल्हा कोरोनामुक्तीचा ‘रोल मॉडेल’ बनला.
राजस्थानातील भिलावाडा जिल्हा टीना डाबी यांच्यामुळे ‘निर्मम भागीदारी’ मॉडेलमुळे प्रकाझोतात आला. हे मॉडल प्रभावीपणे त्यांनी राबविले. देशातील पहिला कोरोना हॉटस्पॉट म्हणून बदनाम झालेला हा जिल्हा कोरोना विरोधातील लढा कसा द्यायचा याचे रोल मॉडेल म्हणून उदयास आला. त्याचे श्रेय हे डाबी यांनाच द्यावे लागेल.
कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात झाले तेव्हा टीना डाबी या कामाला लागल्या. ज्याचे नेतृत्व २६ वर्षीय टीना डाबी यांनी केले. त्यांनी २०१८ पासून जिल्ह्याच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम केले आहे. त्याच्या अनुभवाचा त्यांना खुपच फायदा झाला. कोरोनामुक्त उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यात त्यांनी केली. प्रथम जिल्हा अन्य जिल्ह्यापासून वेगळा करण्याचे खडतर काम त्यांनी केले.
रुग्णांना क्वारंटाईन आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवणे आणि गावात कडक पाळत ठेवणे यापासून झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कडक संचारबंदी केली. विशेष म्हणजे केंद्र सरकारने २५ मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच जिल्हा बंदी आणि संचारबंदी जिल्ह्यात लागू झाली होती. त्यामुळे कोरोना नियंत्रणात या जिल्ह्याने आघाडी घेतली होती. एकेकाळी देशातील पहिला कोरोना हॉटस्पॉट बनलेला भिलावडा कोरोनामुक्त झालाच त्या शिवाय इतर जिल्ह्यांना तो रोल मॉडेल म्हणून उदयास आला, हे विशेष आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२५ च्या परीक्षेमध्ये टीनाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी श्री राम कॉलेजमधून युनिव्हर्सिटी टॉपर म्हणून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. टीना या परीक्षेत अव्वल येणाऱ्या पहिल्या दलित आहेत. त्यांना २०१८ मध्ये आयएएस प्रशिक्षणासाठी राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले आहे.
Bhilawada in Rajasthan became the first corona ‘hotspot’; But, due to Tina Dabi district became the ‘role model’ for others
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App