योगी यांच्या युपीमध्ये आदित्य ठाकरे करणार शिवसेनेच्या ३९ उमेदवारांचा प्रचार 


वृत्तसंस्था

लखनऊ : शिवसेनेच्या युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे, संजय राऊत हे शिवसेना उमेदावारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाही आता प्रचारात उतरणार आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, काही ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.  yuva sena leader aaditya thackeray to visit up; campaign shiv sena candidates in up election



आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी प्रचारात सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर, प्रयागराज जिल्ह्यातील कोरांव येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये आदित्य ठाकरे सामील होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात

भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने ३९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवसेनेने ५९ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, यातील २२ जणांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याने आता शिवसेना उमेदवारांची संख्या ३९ वर आली आहे.

yuva sena leader aaditya thackeray to visit up; campaign shiv sena candidates in up election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात