विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्या प्रकारे नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हे सरकार काय करत आहे. सरकारमधले मंत्री फक्त लपाछपी खेळत आहेत, अशी टीका सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.You can’t run Mumbai Municipal Corporation the way Modi is running the country, Narayan Rane criticizes Uddhav Thackeray
राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे राणेंनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ड्रग्ज या राज्यात यायला नको भावी पिढी उद्धवस्त होत आहे. त्यामुळे ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करणे आणि ड्रग्ज सबंधित लोकांना तुरुंगात टाकण ही सरकारची जबाबदारी आहे.
मात्र सरकार हे करत नाही आहे. ड्रग्ज प्रकरणात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. पण ड्रग्ज बंद करण्यासाठी आम्ही मोहीम सुरु करु, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत. त्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे. पोलिसांना कामाला लावलं पाहिजे. पोलिसांना तुम्ही वसुलीसाठी वापरता,
मग ड्रग्ज राज्यात येत आहे त्याला विरोध करायला का वापरत नाही?”राणे म्हणाले, करोना हाताळायला देखील राज्य सरकार कमी पडत आहे. राज्यात बेरोजगारी वाढली. त्यामुळे यावर उपाय केले पाहीजेत फक्त नरेंद्र मोदींवर टीका करुन नाही भागणार
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App