विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक हजार जणांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांची संपूर्ण माहिती याची संपूर्ण चौकशी घेऊन करण्याचा आदेश तपास यंत्रणांना दिला.Yogi Aditynath direct for strict action
आरोपींवर ‘गँगस्टर’ कायद्यानुसार कारवाई करून ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’ (रासुका) अंतर्गत त्यांना अटक करून मालमत्ता जप्त करण्याचे निर्देशही योगींनी दिले. धर्मांतर करणाऱ्या टोळीतील जहाँगीर आलम कासमी आणि महम्मद उमर गौतम यांना ‘यूपी’ पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने काल लखनौमधून अटक केली होती.
ही टोळी मूकबधिर मुले तसेच महिला व गरीब लोकांना पैसे, नोकरी व विवाहाचे प्रलोभन दाखवून धर्मांतर करीत होती. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’सह काही विदेशी संघटनांकडून यासाठी पैसा पुरविला जात होता.
दरम्यान, जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या या घटनेवरून विविध पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री मोहसीन रजा यांनी काँग्रेस समाजवादी पक्षावर टीका करीत हे पक्ष धर्मांतर कायद्याला का विरोध करीत होती ते आता समजले, असे स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जबरदस्तीने धर्मांतर कधीही स्वीकाहार्य नाही. जे लोक यात सहभागी आहेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App