विशेष प्रतिनिधी
लखनऊ : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेस समाजाचे समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजपं आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल.Yogi Adityanath accepted Owaisi’s challenge, saying that despite his support from the special community, we will contest elections on values.
आम्ही त्यांचं आव्हान स्वीकार करतो असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होते.
ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागादेखील लढवणार आहे. त्यांना उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ओवेसी यांचा स्वत:चा एक पक्ष आहे. ते आपल्या मुद्द्यांवर निवडणुका लढवतील आणि आम्ही आमच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू.
उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मात्र, आत्तापासूनच राजकीय वातावरण गरम झाले आहे. नुकतेच दिल्लीच्या दोºयावर आलेले योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सव्वा तास चर्चा केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ हेच कायम राहणार असून, राज्य मंत्रिमंडळात तूर्तास कोणताही खांदेपालट होणार नाही.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळतील. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रभारी म्हणून गृहमंत्री अमित शहा सांभाळतील. विधानसभेची निवडणूक पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या चेहºयावर निवडणूक लढविली जातील,असे ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App