जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे जपानमध्ये निधन,  ११९ व्या वर्षी मृत्यू; गणिताची होती मोठी आवड


वृत्तसंस्था

टोकियो : जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे जपानमध्ये निधन झाले आहे. केन तनाका, असे त्यांचे नाव आहे. त्यांचा ११९ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांना गणिताची मोठी आवड होती. World’s oldest woman dies in Japan Death at 119 years; I had a great interest in mathematics

केन तनाका यांचे १९ एप्रिलला निधन झाले. सरकारने सोमवारी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. केन तनाका यांचा जन्म २ जानेवारी १९०३ रोजी जपानच्या पश्चिम फुकूओका क्षेत्रात झाला होता. याच वर्षी राइट बंधूंनी विमानाची पहिली चाचणी घेतली होती. तर मेरी क्यूरी नोबेल जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.तनाका नर्सिंग होममध्ये राहत होत्या. तिथे त्या बोर्ड गेम्स खेळत. त्यांना गणिताचे प्रश्न सोडवण्यात विशेष रस होता. त्यांना चॉकलेट खाणेही फार आवडायचे. तरुणपणी त्यांनी विविध व्यवसाय केले. यात नूडल शॉप व राइस केक स्टोअर्सचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांचा विवाह १९२२ मध्ये हाईडिओ तनाका यांच्याशी झाला होता. त्यांना ४ मुले असून, पाचवे मूल त्यांनी दत्तक घेतले आहे.

World’s oldest woman dies in Japan Death at 119 years; I had a great interest in mathematics

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था