वृत्तसंस्था
कटक : जगन्नाथ पुरी मंदिर परिसरात जागतिक दर्जाचा हेरिटेज कॉरिडॉर साकारण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुरी या शहराला लवकरच एक नवीन रूप मिळेल. “जागतिक दर्जाचा” हा हेरिटेज कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर बांधला जात आहे. तो २०२४ पर्यंत तयार होईल. World Class Heritage Corridor in Jagannath Puri Temple area; Naveen Patnaik’s ‘Dream Project’
पुरी हेरिटेज कॉरिडॉर अर्थात श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प असेही म्हटले जाते. हा पटनायक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कॉरिडॉर तयार झाल्यानंतर जगन्नाथ पुरी हे लोकप्रिय तीर्थक्षेत्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर एक विशेष स्थान मिळवेल. प्रकल्पाची एकूण किंमत ३३१.२८ कोटी रुपये आहे. जगन्नाथ मंदिराच्या ७५ मीटर शेजारील १७ एकर जागेवर हा हेरिटेज कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान मोदींच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरशी या प्रकल्पाची तुलना केली जात आहे. पुरी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ सदस्याने सांगितले की, हा प्रकल्प सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधांच्या बाबतीत वाराणसीमधील प्रकल्पापेक्षा कमी नाही. पटनायक यांनी प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच केली आहे. त्यानंतर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढेल. जगन्नाथ संस्कृतीचा जगभरात प्रसार करणे आणि जगभरातून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App