विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव होत आहे. त्याचवेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि भूतपूर्व क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू यांच्यासाठीही निकाल धक्कादायक असणार आहेत. ‘टाइम्स नाऊ’ ने घेतलेल्या एक्झिट पोलनुसार बहुचर्चित नवज्योत सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभूत होणार आहेत.Will Navjyot Sidhu lose with Congress?
तेथे बिक्रम मजिठिया यांनाही जिंकता येणार नाही. या जागेवर आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परवा, १० मार्च रोजी होणार आहे. ७ मार्च रोजी यूपीमधील मतदानाच्या शेवटच्या फेरीनंतर एक्झिट पोल पुढे आले. त्यामध्ये आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे.
स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. एक्झिट पोलमधून आम्ही पंजाबबाबत एकच ठोस निष्कर्ष काढू शकतो, की आम आदमी पार्टी बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. हा पक्ष पंजाबातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करेल. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App