लालूप्रसाद पुन्हा तुरुंगात जाणार का? चारा घोटाळ्याच्या संदर्भातील पाचव्या गुन्ह्यावर सोमवारी निकाल

विशेष प्रतिनिधी

रांची : देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या गुन्ह्यात सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारी राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव व इतर 37 आरोपींच्या शिक्षेचा निर्णय देणार आहे. डोरंडा कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालूंसह एकूण 75 जणांना न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरवले आहे. त्यातील 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता, तर लालू व इतर 37 दोषींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.Will Lalu Prasad go to jail again? Judgment on the fifth offense in the fodder scam case on Monday

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी हे शिक्षा जाहीर करणार आहेत. या संदभार्तील न्यायालयातील संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तयारी पूर्ण केली आहे. लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रिम्स रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती.सोमवारच्या शिक्षेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लालूंसाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. कारागृह प्रशासनाकडून पेइंग वॉर्डमध्ये लालूंसाठी लॅपटॉप पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसेच इतर आरोपींसाठीही होटवार कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व दोषी मोठ्या एलईडी स्क्रीनवर त्यांचा निकाल ऐकू शकणार आहेत.

डोरंडा कोषागारातून अवैधरित्या 139.35 कोटी रुपये काढले गेले होते. लालूंना जर तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने 15 फेब्रुवारीला ज्या 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे,

त्यात माजी खासदार जगदीश शर्मा, पब्लिक अकाऊंट्स कमिटीचे तत्कालीन चेअरमन ध्रुव भगत यांचा समावेश आहे. त्यांना तीनपेक्षा कमी वर्षांची शिक्षा झाल्यामुळे जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. न्यायालयाने त्यांना 20 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

1996 साली तब्बल 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा उघडकीस आला होता. 1990 ते 1995 या कालावधीत हा घोटाळा घडला होता. या संबंधित पाच प्रकरणांमध्ये डोरंडा कोषागारचा घोटाळाचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. अन्य चार प्रकरणांत चाईबासा कोषागारातून एकावेळी 37.7 कोटी रुपये आणि दुसऱ्या वेळी 33.13 कोटी रुपये काढण्यात आले होते.

तसेच देवघर कोषागारातून 89.27 कोटी रुपये आणि दुमका कोषागारातून 36 कोटी रुपयांची रक्कम अवैधरित्या काढण्यात आली होती. लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन विभागातील निधीचा गैरव्यवहार उघडकीस आला होता.

Will Lalu Prasad go to jail again? Judgment on the fifth offense in the fodder scam case on Monday

महत्त्वाच्या बातम्या