वृत्तसंस्था
भोपाळ : मध्यप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी!’ ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला मिळत आहे. Wide Discussion on silver statue of the Prime Minister; The slogan ‘Har-Har Modi, Ghar-Ghar Modi’ will come true in Madhya Pradesh
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाखो चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी कुर्ता आणि मोदी जॅकेटची क्रेझ होती आणि आहे. आता पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी!’ ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलत आहे.
इंदूरचे सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली. आपल्या दुकानातून मूर्तीची विक्री करण्याचा वर्मा यांचा विचार आहे. सध्या दोन मूर्ती आल्या आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत आणखी पाच मूर्ती येणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती पाहण्यासाठी निर्मल वर्मा यांच्या दुकानासमोर लोकांची गर्दी होत आहे.
नरेंद्र मोदींच्या १५० ग्राम मूर्तीची किंमत ११ हजार रुपये आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत या मूर्ती असणार आहेत. सध्या केशरी आणि निळ्या रंगातील कुर्त्यामधील दोन मूर्ती पोचल्या आहेत. मुंबईच्या एका मोठ्या ज्वेलर्स शोरुमवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीच्या मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यांनी याआधी मोदींचा फोटो असलेली चांदीची नाणी विकली होती. नरेंद्र मोदी यांना आपल्या हस्ते एक मूर्ती भेट द्यावी, अशी निर्मल वर्मा यांची इच्छा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App