प्रतिनिधी
मुंबई : देशात वाढलेल्या लव्ह जिहाद, लँड जिहाद या मुद्द्यावर आज सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. दादर येथील शिवाजी पार्क ते प्रभादेवी असं मार्गक्रमण करणाऱ्या या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. Why Sharad Pawar is not talking about Love Jihad?; Question of Gunaratna Sadavarta
या मोर्चात शिंदे गट, भाजप नेते आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चात महिलांची संख्या मोठी होती. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते देखील सहभागी झाले होते. यावेळी एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार लव्ह जिहादवर का बोलत नाहीत?, असा सवाल सदावर्तेंनी केला.
गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; मात्र सदावर्तेंचा ताबा घेणार सातारा पोलीस; जयश्री पाटील फरार!!
पाकिस्तान्यांच्या नीच विचारांमधून जे लव्ह जिहाद चालू झाले, त्या लव्ह जिहादला दफन करण्यासाठी मुंबईतील हिंदू एकवटला. सरकारला साकडं घालतं आहे की, लव्ह जिहाद विरोधी कायदा आणा. दाऊद इब्राहिमचा विचार दफन करा. बाबरचा विचार दफन करा. हे इथं आक्रमक म्हणून आले आणि धर्मप्रचार करू लागले. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता आज हिंदू एकवटला आहे. शरद पवारांना दुसऱ्या विषयांवर बोलायला सुचतं, लव्ह जिहादवर बोलायला का सूचतं नाही? हैदराबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही? या सगळ्यांना प्रश्न विचारण्यासाठी, उघडं पाडण्यासाठी आणि लव्ह जिहादला ठोकरण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.
या जन आक्रोश मोर्चात लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींची कुटुंबे आणि काही मुली असे काही पीडिताही या मोर्चात सहभागी झाले होते. महिलांनीच मोर्चाचे नेतृत्व केले. प्रभादेवी परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या राज्यात आज लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या मुली, तसंच महिला या आज असुरक्षित झाल्या आहेत. हिंदू मुली, महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी श्रद्धा वालकर याचं ताजे उदाहरण आहे. अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. यामुळे याबाबत कायदा करावा, दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलक करत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App