पश्चिम बंगालमध्ये पोलीस भरती का आणि कशी रोखली गेली…??


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेली पोलीस भरती रोखली गेली आहे, ती १००० मुस्लीम मुलींनी आपल्या हिजाब पेहरावाच्या कथित अधिकाराच्या जपणुकीसाठी कोलकत्ता हायकोर्टात धाव घेतल्याने…!! Why and how was police recruitment stopped in West Bengal … ??

पश्चिम बंगाल पोलीस भरती मंडळाने 26 सप्टेंबर 2019 रोजी पोलीस भरतीसाठी परीक्षा घेतली याची नियमावली आधी जाहीर केली होती त्यामध्ये आवेदन कर्त्यांनी आपले फोटो विशिष्ट नमुन्यात अर्जावर लावायला सांगितले होते. यामध्ये चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे. कोणताही स्कार्फ, रंगीत गॉगल किंवा चेहरा झाकेल अशा वस्तू न वापरता फोटो अर्जाबरोबर अपलोड करावा आणि सादर करावा, अशा स्पष्ट सूचना पोलीस भरती मंडळाने दिल्या होत्या. सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे त्या दिवशीची परीक्षा देता आली नाही.



परंतु सुमारे १००० मुस्लिम मुलींनी हिजाबसह आपले फोटो आवेदन पत्रावर लावल्याचे पोलीस भरती मंडळाला आढळले होते. पोलीस भरती मंडळाने नियमानुसार संबंधित आवेदनपत्रे नाकारली. याविरोधात काही संघटनांनी कोलकता हायकोर्टात धाव घेतली आहे. हिजाब पेहराव करणे हा मुस्लिम मुलींचा संविधानिक अधिकार आहे तो मान्य केला पाहिजे, असा दावा वकिलांनी केला आहे.

यावर सुनावणी घेताना कोलकता हायकोर्टाचे न्यायाधिश मुखर्जी यांनी पोलीस भरतीला प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. मात्र ही स्थगिती म्हणजे आपला विजय असल्याचे आवेदन कर्त्यांनीचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पोलीस भरती रद्द केलेली नाही. परंतु हिजाब पेहराव करणे या मुद्द्यावरून संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याची पोलीस भरती सध्यातरी स्थगित झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. पुढील सुनावणी नंतर ही पोलीस भरती प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे.

Why and how was police recruitment stopped in West Bengal … ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात