संपूर्ण कॉंग्रेस पार्टी सिध्दूच्या कॉमेडीच्या रंगात रंगलीय, कॅ.अमरिंदरसिंग यांची टीका


विशेष प्रतिनिधी

जालंधर: पंजाबमध्ये काँग्रेसमधील कलह हाताळण्यात जे नेते अपयशी ठरले आहेत तेच आता माझी बदनामी करत आहेत. एकीकडे हरीश रावत म्हणतात, ४३ आमदारांनी माझ्याविरोधात पत्रे लिहिली. आता रणदीप सुरजेवाला सांगत आहेत की ७९ आमदारांपैकी ७८ आमदारांची पत्रे मिळाली. यावरून संपूर्ण काँग्रेस पार्टी सिद्धूच्या कॉमेडीच्या रंगात रंगली आहे,अशी टीका पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी केली आहे.Whole congress is in the color of Sidhu’s comedy, Criticism of Amarinder Singh

कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, पंजाब विधानसभेच्या सर्व १७७ आमदरांनी पत्रे लिहिली होती, असा दावाही उद्या काँग्रेस नेते करतील. ४३ आमदारांवर दबाव आणून त्यांच्याकडून स्वाक्षºया घेतल्या गेल्या. आपले अपयश लपवण्यासाठी काँग्रेस नेते आता खोटे बोलत आहेत



काँग्रेस नेते खोटं बोलतानाही एकमेकांमध्ये समन्वय ठेवू शकत नाही. काँग्रेस पूर्ण अस्थिर झाली आहे. हे संकट सतत वाढत आहे. काँग्रेसमधील बहुतेक वरिष्ठ नेत्यांचे पक्षातील कामकाजावरून मन उडाले आहे,असा टोलाही त्यांनी लगावला.

कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, काँग्रेसने २०१७ नंतर पंजाबमधील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७७ जागा जिंकल्या होत्या. यानंतर पोटनिवडणुकीत ४ पैकी ३ जागा जिंकल्या. सुखबीर बादल यांचे वर्चस्व असलेल्या जलालाबादची जागाही काँग्रेसने जिंकली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने १३ पैकी ८ जागा जिंकल्या.

त्यावेळी संपूर्ण देशात भाजपची लाट होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ७ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसने ३५० पैकी २८१ जागा जिंकल्या म्हणजे ८०.२८ टक्के. नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. यात १०९ पैकी ९७ काँग्रेसचे नगरसेवक जिंकले.

काँग्रेसने २,१६५पैकी १,४८६ प्रभाग जिंकले म्हणजे ६८ टक्के. सुरजेवालांनी दावा केल्याप्रमाणे पंजाबचा माझ्यावरील विश्वास उडाला नव्हता. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या इशाऱ्यावरून काही नेते आणि आमदारांनी हे संपूर्ण वातावरण तयार केले.

Whole congress is in the color of Sidhu’s comedy, Criticism of Amarinder Singh

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात