ढोंगी धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त करेल देश, केरळमधील बिशप जोसेफ कल्लरंगट यांची टीका


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : धर्मनिरपेक्षतेच्या खऱ्या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज असून, ढोंगी धर्मनिरपेक्षता देश उद्ध्वस्त करेल, अशी टीका सिरो-मलबार कॅथलिक चर्चच्या पाला प्रांताचे बिशप जोसेफ कल्लरंगट यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी मादकपदार्थ आणि लव्ह जिहादच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद उफाळला होता.Hypocrisy secularism will destroy country, says Bishop Joseph Kalrangat in Kerala

गांधी जयंतीनिमित्त दीपिका डेली या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी ही टीका केली आहे. केरळातील समाजात सद्य:स्थितीत असलेल्या धर्मनिरपेक्षतेबद्दल ते म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षतेचा मार्ग निवडून केरळातील धार्मिक ध्रुवीकरणाकडे जात आहोत की नाही, हा आजचा सर्वांत मोठा काळजीचा विषय आहे.धर्मनिरपेक्षतेचे फायदे कुणाला मिळतात, यावर समाजाच्या विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धर्मनिरपेक्षता देशाचा गाभा असला, तरी ढोंगी धर्मनिरपेक्षता देशाला उद्ध्वस्त करेल.या लेखामध्ये त्यांनी मादकपदार्थ आणि लव्ह जिहादचा उल्लेख न करता, आपल्याच समुदायातील वाईट गोष्टी बोलू नये असे सांगणाऱ्यांवर टीका केली आहे.

मागील महिन्यात मादकपदार्थ आणि लव्ह जिहादच्या वक्तव्याचे त्यांनी या लेखात अप्रत्यक्षपणे समर्थन केले. जे लोक चुकांच्या विरोधात बोलत नाहीत, ते या चुका आणखी वाढाव्यात, याचे समर्थन करीत असल्याचे त्यांनी म्हटले. समाजातील चुकींच्या गोष्टींबाबत दिलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर चर्चा आणि अभ्यास करावा. या माध्यमातून पुढे होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतील, असे त्यांनी लेखात म्हटले आहे.

Hypocrisy secularism will destroy country, says Bishop Joseph Kalrangat in Kerala

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण