सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वैयक्तिक पातळीवर पावले उचलून 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाला सशक्त करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. नागरिकांमधील ही जागरुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि इतर योजनांच्या रचनात्मक कृतीकडे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.Take an oath for a strong, self-reliant India, appeals Union Home Minister Amit Shah

नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोंनी हाती घेतलेल्या 7,500 किमीच्या कार रॅलीला लाल किल्ला येथे हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. शाह म्हणाले, देशाला पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करण्याची शपथ प्रत्येक नागरिकाने घेतल्यास,देशाला आपण आत्मनिर्भर करू शकतो आणि एक शक्तिशाली देश म्हणून गौरव मिळवून देऊ शकतो.नागरिकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात आवाहन केले होते. भारताचा विकास घडवण्याचा उद्देश त्या आवाहनामागे होता.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर करून विकसित करण्यासाठी देशातील नागरिकांनी एकत्र यावे आणि समर्पित वृत्तीने काम करावे, असे आवाहन मी देशातील प्रत्येक नागरिकाला करीत असल्याचे शाह यांनी सांगितले.

Take an oath for a strong, self-reliant India, appeals Union Home Minister Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात