कर्नाटक भाजपाच्या ‘भीष्माचार्यां’ना घालवायचे तर नवे मुख्यमंत्री कोण?


कर्नाटक पहिल्यांदाच जिंकून भाजपाच्या दक्षिण विजयाची पायाभरणी करणारे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा सध्या विरोधाचा सामना करत आहेत. 78 वर्षांचा हा नेत्या पक्षातल्याच विरोधकांमुळे गारद होणार का याची चर्चा आहे. यातच काहींनी गुडघ्याला बाशींग बांधून कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री होण्यासाठीची मोर्चेबांधणी चालू केली आहे. Who will replace Yediyurappa as Karnataka CM; If BJP high command want change, it has to happen now as election 2023 is close.


वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटक भाजपाचे ‘भीष्माचार्य’ बी. एस. येडीयुरप्पा यांच्या निकटवर्तीय आमदारांनी राज्यातल्या नेतृत्त्व बदलाची चर्चा फेटाळून लावली आहे. येडीयुरप्पा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सहज पूर्ण करतील.

एवढेच नव्हे तर दोन वर्षांनी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाचे नेतृत्त्व पुन्हा त्यावेळी ऐंशी वर्षांचे असणारे येडीयुरप्पाच करतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.कर्नाटक सरकारचे काही निर्णय, कोरोना महामारीच्या साथीतली सरकारची कामगिरी, भ्रष्टाचाराचे आरोप या काही मुद्यांवरुन येडीयुरप्पा यांना घेरण्याचा प्रयत्न चालू आहे.

या पार्श्वभूमीवर काही भाजपा आमदारांनी लॉकडाऊच्या शेवटच्या दिवशी म्हणजे येत्या सात जूनला पक्षाची बैठक घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. या बैठकीत येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वावर अविश्वास व्यक्त करण्याचा काही भाजपा आमदारांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.

कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले, “अनेक आमदारांनी दिल्लीत मोर्चेबांधणी चालू केल्याचे मला समजले आहे. आजसुद्धा अनेक ठिकाणी बैठका चालू असल्याची माहिती माझ्याकडे आहे. काही मंत्रीच या बैठकांमध्ये सहभागी असल्याचे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरुन स्पष्ट होते.

नेतृत्त्वावरुन चर्चा चालू आहे ही बाब खरी आहे.” काही आमदारांनी दिल्ली गाठल्याचे मला ठाऊक आहे. काही खलबते चालू आहेत हे शंभर टक्के खरे आहे. काहीजण उघडपणे तर काही जण लपून यात सहभागी आहेत. मात्र माझे प्राधान्य कोरोना संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्यास आहे, असे ते पुढे म्हणाले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण, गृहमंत्री बसवराज एस. बोम्मई, गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा, उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी मात्र मुख्यमंत्री बदलाची शक्यता पूर्णतः फेटाळून लावली. ‘सत्यापासून दूर’ या शब्दात अश्वथ नारायण यांनी नेतृत्त्व बदलाच्या चर्चेला विराम दिला. येडीयुरप्पा हे आमचे मुख्यमंत्री आणि नेते आहेत, असे त्यांनी सांगितले. “कोरोना नियंत्रणासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात काम करतो आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी माझा पर्याय म्हणून विचार होऊ शकतो, अशा बातम्यांना महत्त्व देण्याची गरज नाही,” असे नारायण यांनी स्पष्ट केले.

काही आमदारांनी दिल्लीत मोर्चेबांधणी चालू केली असल्याबद्दल विचारले असता नारायण म्हणाले की, मला याची माहिती नाही. केवळ माध्यमांमधूनच मी या संदर्भात ऐकले. येत्या 7 जुनला पक्षाची कोणतीही बैठक बोलावली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री बदलाची चर्चा आणि विधिमंडळ पक्षाची बैठक या संदर्भातल्या बातम्या ‘अनाधिकृत’ आणि केवळ ‘अंदाजपंचे’ असल्याचे गृहमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

तर मंत्री सोमण्णा म्हणाले की, येडीयुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी नसून ती बळकट आहे. माजी मुख्यमंत्री आणि येडीयुरप्पा यांच्या मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री शेट्टार यांनीही सांहितले की, नेतृत्त्व बदलाची कोणतीही चर्चा राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर नाही.

कर्नाटकचे पर्यटन मंत्री सी पी. योगेश्वर आणि हुबळी-धारवाड (पश्चिम)चे आमदार अरविंद बेल्लाड यांनी दिल्लीत येडीयुरप्पा यांच्या विरोधात मोर्चेबांधणी चालू केली असल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपा आमदारांमध्ये येडीयुरप्पा यांच्याबद्दल असणारा असंतोष व्यक्त करण्यासाठी ते भाजपाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

येडीयुरप्पा यांची कार्यशैली पाहता त्यांना बदलण्याची गरज असल्याचे भाजपा आमदारांचे मत पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. आणखी काही आमदार दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याची चर्चा आहे.

बोम्मई आणि कर्नाटक भाजपाचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र (येडीयुरप्पा यांचे पुत्र) यांनी जून महिन्याच्या सुरवातीलाच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. त्यामुळे येडीयुरप्पा यांना बदलले जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला. दरम्यान, कर्नाटक विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे सिद्धरामय्या म्हणाले की पुढचा जो कोणी मुख्यमंत्री होईल तोही कमकुवतच असेल. येडीयुरप्पा यांना बदलावे अशी मागणी सिद्धरामय्या यांनीही यापुर्वी अनेकदा केली आहे.

येडीयुरप्पा समर्थक आमदारांनी मात्र त्यांना बदलण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येडीयुरप्पा यांनी कोणती चूक केली म्हणून त्यांना बदलावे, त्यांना बदलण्याची कोणतीही गरज नाही. पक्षाचे बहुसंख्य आमदार त्यांच्यासोबत आहेत, अशी भूमिका येडीयुरप्पा समर्थकांनी घेतली आहे. लिंगायत समाजातील ताकदवान नेते ही येडीयुरप्पा यांची ओळख आहे.

भाजपा आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव एस. आर. विश्वनाथ म्हणाले की, येडीयुरप्पा हेच मुख्यमंत्री राहतील. शिवाय येत्या निवडणुकीतही तेच पक्षाचे नेतृत्त्व करतील. ”येडीयुरप्पा यांच्यामुळेच कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळाली. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ज्यांची नावे घेतली जात आहेत ते लोकसुद्धा येडीयुरप्पा यांच्याशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत,” असे आमदार मदल विरुपाक्षप्पा म्हणाले.

येडीयुरप्पा यांच्या मदतीशिवाय जे स्वतः जिंकू शकत नाहीत, ते राज्याचे मुख्यमंत्री कसे होऊ शकतील, अशा प्रश्न उपस्थित करुन विरुपाक्षप्पा म्हणाले की येडीयुरप्पा यांच्यामुळेच दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपाची सत्ता आहे याची केंद्रीय नेतृत्त्वाला कल्पना आहे. हे राज्य घालवण्याची त्यांची इच्छा नक्कीच नाही.

दरम्यान, बेल्लारी जिल्ह्यातील 3 हजार 667 एकर जमीन जेएसडब्ल्यू ग्रुपला देण्याचा येडीयुरप्पा सरकारचा निर्णय वादग्रस्त असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सत्तेत नसताना भाजपानेच या निर्णयाला विरोध केला होता.

त्याशिवाय कोविड काळातली सरकारची कामगिरीही निराशजनक आहे. त्यामुळे नेतृत्त्व बदल करायचा असेल तर पक्षाने तो आत्ताच केला पाहिजे. कारण आगामी 2023 मधली निवडणूक जवळ आली आहे, असेही काही भाजपा आमदारांचे म्हणणे आहे.

Who will replace Yediyurappa as Karnataka CM; If BJP high command want change, it has to happen now as election 2023 is close.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती