वृत्तसंस्था
गोरखपुर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातली 500 पेक्षा अधिक संस्थाने आपल्या कठोर राजकीय धोरणातून भारतीय संघराज्यात विलीन करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, पण छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेश मधल्या गोरखपुरमध्ये केलेल्या भाषणातून नव्या राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे.Who exactly is responsible for the merger of Indian states? Sardar Vallabhbhai’s or Nehru’s ?; Bhupesh Baghel’s speech sparked a new controversy
“सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या बरोबर राहून संस्थाने भारतात विलीन केली”, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केले आहे. प्रियांका गांधी यांच्या प्रतिज्ञा रॅलीत ते बोलत होते. सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी वरील वक्तव्य केले. यातून भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणानंतर नेमके श्रेय कोणाचे? आणि राजकीय कर्तृत्व कोणी दाखविले? यावर ऐतिहासिक वाद उफाळला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल केंद्रात गृहमंत्री होते. उपपंतप्रधान होते. काँग्रेसच्या बहुसंख्य प्रदेश समित्यांचा वल्लभभाईंना पाठिंबा होता. त्यांनी विविध संस्थानांच्या राजांची आणि प्रमुखांशी वाटाघाटी करून 500 हून अधिक संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करून घेतली. हा इतिहास आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरित्रामध्ये तो अधिकृतरित्या नमूद आहे. मात्र भूपेश बघेल यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांनी नेहरूंबरोबर राहून संस्थाने भारतात विलीन केल्याचा उल्लेख आहे.
Today we're celebrating birth anniversary of #SardarPatel. He had started Bardoli farmers' agitation & shaken the foundation of British rule. He along with Nehru ji, integrated over 500 princely states & formed an 'akhand Bharat': Chhattisgarh CM Bhupesh Baghel in Gorakhpur pic.twitter.com/EP5T7dh6Su — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 31, 2021
Today we're celebrating birth anniversary of #SardarPatel. He had started Bardoli farmers' agitation & shaken the foundation of British rule. He along with Nehru ji, integrated over 500 princely states & formed an 'akhand Bharat': Chhattisgarh CM Bhupesh Baghel in Gorakhpur pic.twitter.com/EP5T7dh6Su
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 31, 2021
नेमका हाच वादाचा मुद्दा समोर येताना दिसतो आहे. पंडित नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेत नेला. पण त्याआधीच वल्लभभाई पटेल यांनी जम्मू काश्मीरचे राजे हरिसिंग यांना सामीलीकरणावर सही करायला लावली होती. मात्र हा प्रश्न पंडित नेहरूंनी संयुक्त राष्ट्र संघात नेल्यामुळे तो देशांतर्गत प्रश्न न राहता आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा बनला, अशा पद्धतीची ऐतिहासिक मांडणी देखील करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. याच भाषणात भूपेश बघेल यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाची महती गायली आहे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले जायचे, पण संधी येताच इंदिरा गांधींनी देश कसा चालवायचा याचे धडे घालून दिले. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. सध्याचे सरकार काहीही करताना दिसत नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
परंतु भूपेश बघेल यांचे भाषण त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया देखील चर्चेत आहे. संस्थानांच्या विलीनीकरणाचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांचे असताना त्यामध्ये भूपेश बघेल यांनी पंडित नेहरूंचे नाव आणल्याने नव्या राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App