मायावी TRF : जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांच्या हत्येची जबाबदारी घेणारी “द रेझिस्टंट फ्रंट” आहे तरी काय??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे डीआयजी अर्थात पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमधील “द रेझिस्टंट फ्रंट” TRF या संघटनेने घेतली आहे. ही संघटना आहे तरी काय??, याचा तपशील वाचल्यावर त्यांच्या विघातक कृत्यांची जाणीव होईल. What is TRF and its motives and terrible intentions

मूळात ही जम्मू कश्मीर मधली दहशतवादी संघटना आहे. अशाच नावाची म्हणजे “द रेझिस्टंट फ्रंट ऑफ अफगाणिस्तान” नावाची संघटना अफगाणिस्तान मध्ये देखील कार्यरत आहे. त्या संघटनेचे इरादे देखील इस्लामी राजवटीचेच आहेत.

परंतु जम्मू काश्मीर मधील “द रेझिस्टंट फ्रंट” TRF ही संघटना राज्यामधून 370 कलम हटवल्यानंतर उभारण्यात आल्याची माहिती आहे. अर्थातच तिच्या नावात कुठेही इस्लामशी संबंध असल्याचे दिसत नाही. हेच ते नेमके विविध दहशतवादी संघटनांचे मायावी स्वरूप आहे. 1990 च्या दशकात दहशतवादी संघटना उघडपणे इस्लामशी संबंधित नावे घेऊन घातपाती कारवाया करत असत. “लष्कर ए तैय्यबा”, “हिजबुल मुजाहिदिन” वगैरे नावे धारण करून या संघटना दहशतवादी कारवाया करत असत. परंतु, आता दहशतवादी संघटनांनी आपल्या नावाचा पॅटर्न बदलून त्यामधला इस्लामी अंश बाजूला केला आहे. त्यामुळेच “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” अर्थात PFI किंवा सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया अर्थात SDPI अशा लोकशाहीचे आवरण घेतलेल्या नावाच्या संघटना कार्यरत करण्यात आल्या. “द रेजिस्टंट फ्रंट” TRF ही जम्मू काश्मीर मधली अशीच मायावी नाव धारण केलेली दहशतवादी संघटना आहे.


J&K DG Murder: जम्मू-काश्मीरचे DG हेमंत लोहिया यांची राहत्या घरात हत्या, दहशतवादी संघटना TRF ने घेतली जबाबदारी


TRF “द रेझिस्टंट फ्रंट”ला अर्थातच पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा पुरता पाठिंबा आहे. किंबहुना दुनियेच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी पाकिस्तानने “हिजबुल मुजाहिदिन” आणि “लष्कर ए तैय्यबा” यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाया केल्या. परंतु, त्यातले दहशतवादी मात्र त्यांनी “द रेझिस्टंट फ्रंट” मध्ये भरती करून दहशतवादी कारवाया चालूच ठेवण्याची त्यांना चिथावणी दिली. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर ही संघटना जास्त कार्यरत करण्यात आली.

जम्मू काश्मीरच्या अनंतपुर मधले शिक्षक माखनलाल बिंद्रू यांची या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यावेळी त्यांनी उघडपणे माखनलाल बिंद्रू हे संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे हस्तक असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे पत्रक काढले होते. या पत्रकावरूनच त्यांचे घातपाती इरादे स्पष्ट झाले होते. संबंधित संघटनेचे नाव जरी TRF “द रेझिस्टंट फ्रंट” म्हणजे “प्रतिकार करणारी संघटना”, असे असले तरी प्रत्यक्षात देशात इस्लामी राजवट लादणे हेच या अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणेच संघटनेचे अंतिम ध्येय आहे. लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद, अल बदर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चारही संघटनांचे दहशतवादी सध्या “द रेझिस्टंट फ्रंट” या संघटनेच्या नावाखाली कार्यरत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा फैलावण्यासाठी निवडक हत्या करणे आणि त्या पलिकडे जाऊन संपूर्ण देशात हिंसाचाराचे थैमान घालणे हा “द रेझिस्टंट फ्रंट” TRF या दहशतवादी संघटनेचा इरादा आहे, असे गुप्तचर खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या ही याच हिंसाचार फैलावण्याच्या इराद्यातील एक महत्त्वाची कडी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते विविध विकास कामांची उद्घाटने करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेमंत लोहिया यांच्यासारख्या पोलीस महासंचालक पदावर असणाऱ्या एवढ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करून TRF “द रेझिस्टंट फ्रंट”ने सरकारला कडवे आव्हान दिले आहे. सरकार आता या संघटनेचा कसा मुकाबला करते??, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

What is TRF and its motives and terrible intentions

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात