आर्यन खानसाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

विशेष प्रतिनिधी

मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास 24 दिवसांनंतर मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात अटक केलेल्या आर्यन खानला आज जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीकडे अनेक लोकांचे लक्ष लागून राहिले होते. एनसीबी आणि आर्यनचे वकील रोहतगी या दोघांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला जामिनावरील अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी जाणार आहे हे मात्र स्पष्ट झाले आहे. आर्यन खानला बेल मिळाल्यानंतर बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांनी ट्विटरद्वारे आपला आनंद आणि सपोर्ट व्यक्त केला आहे.

What did former Indian Attorney General and senior lawyer Mukul Rohatgi argue for Aryan Khan?

आर्यन खानची यांची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयामध्ये हजर होते. वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली होती. त्यावर रोहतगी यांनी आपला युक्तिवाद केला. नेमका काय युक्तिवाद त्यांनी केला? चला पाहूया


Aryan Khan Drugs Case : एनसीबीचा युक्तिवाद लवकर पूर्ण झाला, तर आजच आर्यनच्या जामिनावर येऊ शकतो निर्णय


वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे ड्रग आहेत किंवा नाही याबाबत आर्यन खानला कोणतीही माहिती नव्हती. आर्यनविरोधातील कलम 27 अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबत असलेल्या काही लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय. हे एनसीबीचे षडयंत्र आहे.”

पुढे त्यांनी युक्तिवाद देताना म्हटले, क्रुझ शिपवर एकूण 1300 लोक हजर होते. पण एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलेलं आहे. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे.

“जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही.” असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.

What did former Indian Attorney General and senior lawyer Mukul Rohatgi argue for Aryan Khan?

 

महत्त्वाच्या बातम्या